पॅरिस : पॅरिस या ठिकाणी चालू असलेल्या ऑलिंपिकमध्ये भारताची अनुभवी महिला कुस्तीपटू, विनेश फोगाट हिने मंगळवारी इतिहास घडवला. तिने 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. पॅरिसमध्ये भारताचे एक पदक आता निश्चित झाले. ७ ऑगस्ट रोजी तिला सुवर्णपदकाच्या लढतीत भाग घ्यायचा आहे. विनेश हिने उपांत्य फेरीच्या लढतीत क्युबाच्या लेणीस गुजमान हिला पाच शून्य असे सहज पराभूत करत अंतिम फेरीवर आपले नाव कोरले. काही महिन्यांपूर्वी भारतीय कुस्ती संघटनेच्या माजी अध्यक्षांविरुद्ध लैंगिक शोषणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या दिनेश फोगाट हिने मंगळवारी पहिल्या लढतीपासूनच धडाकेबाज कामगिरी केली. पहिल्या दोन ऑलंपिकमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या विनेश हिने पॅरिसमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत लढत संपायला काही सेकंद बाकी असतानाच भुजबान हीच एक पाय पकडून तिच्यावर पकड मिळवली. त्यानंतर तिने महत्त्वाचे गुण मिळवत अगदी दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.