अहमदनगर : झाकण नसलेल्या हौदात पडून नाकातोंडात पाणी गेल्याने एका चार वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील प्रत्येक इमारतीमधील झाकण नसलेल्या हौदांचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुळात पाणी भरण्यासाठी किंवा साठवण्यासाठी आजही अहंमदनगरमध्ये हौदांची जुनी पद्धत टिकून आहे. मात्र त्या हौदांवर काळजीपूर्वकपणे झाकणे बसवून घेतली जात नाहीत. परिणामी त्यामुळे अनेक अपघाताना यामुळे जणू निमंत्रण मिळत असते.याची जाणीव होण्यासाठी प्रत्येक वेळी कोणाचे तरी प्राण पणाला लागावेत याची वाट पहाणे योग्य नाही. याच पार्शभूमीर एक ४ वर्षांच्या चिमुरड्याच्या मृत्युंनतर महापालिकेने मुकुंदनगरमधील काही हौद जेसीबीने बुजविले आहेत. मात्र, नागरिकांनी स्वतः सजग होऊन हौदांना झाकणे बसवून घ्यावीत, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.
शहरात दिवसेंदिवस इमारतींची संख्या वाढत आहे. इमारतीचे बांधकाम करताना पाण्यासाठी पहिला हौद बांधला जातो. परंतु या हौदांच्या झाकणांकडे बहुतेकजण दुर्लक्ष करतात. अपार्टमेंट, बंगला, रो हाऊस, तसेच व्यावसायिक इमारतींमधील हौदांना झाकणे नसल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. त्यानंतरही अशा घटना घडतच आहेत. मुकुंदनगरमध्ये तर चिमुरड्याच्या मृत्यू प्रकरणी हौदाच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. शहरात जागोजागी नवीन इमारतींची बांधकामे सुरू आहेत. बांधकामांच्या ठिकाणी पाण्यासाठी हौद बांधला जातो. परंतु इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत हे हौद उघडेच असतात. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी महापालिकेने बांधकाम परवानगी देताना काही नियम घालून देण्याची गरज आहे.
पाण्याच्या हौदांशिवाय काही ठिकाणी ड्रेनेज च्या झाकणाची मोडतोड झालेली आहे तर काही ठिकाणी ड्रेनेजला झाकणेच लावलेली नाहीत.शहरात अनेक ठिकाणी भूयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी भूयारी गटारीचे झाकणे देखील गायब आहेत. त्यामुळे ड्रेनेजमध्ये पडून एखाद्यावा जीव
जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोकाट श्वान, जनावरे उघड्या ड्रेनेजमध्ये पडून जखमी झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.अनेक ठिकाणी ड्रेनेजचे चेंबरच खचले आहेत.शहरातील गल्ली-बोळांतून केलेल्या काँक्रिटीकरणाच्या हेनेजवरील भागाचे काँक्रिट खचल्याने ते धोकादायक बनले आहेत मुकुंदनगर येथे चार वर्षांच्या मुलाचा झाकण नसलेल्या हौदात पडून मृत्यू झाला. महापालिकेने संबंधित हौदाची पाहणी करून तो बुजवून टाकला आहे. तरीही नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने हौदांना झाकणे बसविणे गरजेचे आहे.असे आवाहन महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.