‘लाडकी बहीण’ नंतर आत्ता ‘लाडका शेतकरी’ योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी योजने नंतर आता शिंदे सरकार लाडका शेतकरी ही योजना राबवणार आहोत. शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते तपासावे त्यांच्या खात्यात दोन हजार रूपये आले आहेत की नाहीत ते पहावे. शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या योजना बंद करा असे राज्यातील विरोधक म्हणत होते परंतु त्या योजना आम्ही सुरूच ठेवल्या आहेत. हे सरकार सर्व सामान्यांचे आहे. शेतकऱ्यांचे आहे. म्हणून आजपासून लाडका शेतकरी ही योजना राबवू, ई-पीक पाहणी ऐवजी सातबारावर पिकांची नोंद आहे त्या. सगळ्यांना मदत देण्याचा निर्णय आपण घेत आहोत, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परळीत बुधवारी राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उदघाटना प्रसंगी बोलतांना केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर बुधवारी दुपारी पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन झाले त्यावेळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार पंकजा मुंडे, पाशा पटेल यांची उपस्थिती होती. प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार रुपये केंद्र सरकार देशभरात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला दरवर्षी ६ हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. दर ४ महिन्यांच्या अंतराने २ हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. अशाच प्रकारची योजना महाराष्ट्र सरकारने देखील सुरु केली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य सरकारने सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार केंद्र सरकारच्या ६ हजार रुपयांमध्ये आणखी ६ हजार रुपयांची भर घातली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष १२ हजार रुपये मिळणार आहेत.