डॉ.विखे पा.अभियांत्रिकीत इलेक्ट्रीकल विषयावर सेमीनार संपन्न
विजेसोबत काम करताना सुरक्षेतेची खबरदारी घेणे अत्यंत महत्वाचे - सुधीर पाटील
अहमदनगर : विद्युत असुरक्षीतता टाळण्यासाठी विद्युतीय उपकरणे हाताळण्याची आणि देखभाल करण्याची एक सामान्य प्रथा आहे. आजुबाजुच्या लोकांसाठी व पर्यावरण सुरक्षीत ठेवण्यासाठी असलेले धोके ओळखण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी पुरेसे प्रशिक्षण आवश्यक असते. तुम्ही कामावर असाल किंवा घरी दोन्ही सेंटींग्ज विजेवर चालतात. विजेसोबत काम करताना सुरक्षीततेची खबरदारी घेणे अत्यंत महत्वाचे आहे, असे प्रतिपादन सुधीर पाटील यांनी केले. डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रीकल इंजिनीअरींग विभागातर्फे विद्युत सेफ्टी आणि भारतातील लिगल रिक्वायरमेंटवर सेमीनारचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्याख्याते मुंबईचे लिड ऑडीटर अॅण्ड सेफ्टी ऑडीटर सुधीर पाटील, संस्थेचे प्राचार्य डॉ.उदय नाईक, विभागप्रमुख डॉ.अजित लावरे, प्रा.कल्पना विधाते आदी उपस्थित होते. सुधीर पाटील पुढे म्हणाले, मूलभूत सुरक्षा खबरदारी जोखीम कमी करण्याचे सोपे मार्ग असतात. सर्व उपकरणे व्यवस्थित कार्यरत असल्याचे तपासुण जर तुम्हाला दोष आढळला किंवा संशय आला, तर उपकरणे वापरणे थांबवा, विद्युत पुरवठा खंडित करा आणि वापरू नका असे लेबल लावा. पुरेशी सॉकेट-आउटलेट प्रदान करून ओव्हरलोडिंग सॉकेट टाळा, जेथे शक्य असेल तेथे कामाच्या दिवसाच्या शेवटी सर्व उपकरणे बंद करा, तुम्ही उपकरणे साफ करण्यापूर्वी किंवा समायोजन करण्यापूर्वी ते बंद करा आणि अनप्लग करा, आपत्कालीन स्थितीत वीज खंडित करण्यासाठी निश्चित मशिनरीजवळ प्रवेशयोग्य आणि स्पष्टपणे ओळखले जाणारे स्विच प्रदान करा, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.कल्पना विधाते यांनी केले. तसेच या प्रसंगी विभागप्रमुख डॉ.अजित लावरे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला व आभार व्यक्त केले. संस्थेचे प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी या सारख्या महत्वाच्या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केल्याबद्दल विभागप्रमुखांचे कौतुक केले. या आयोजनासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील तसेच संस्थेचे सेक्रेटरी जनरल (ऑफीसिएटींग) तथा डायरेक्टर टेक्निकल डॉ.पी.एम. गायकवाड व उपसंचालक सुनिल कल्हापुरे यांनी शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.