शहर विधानसभेसाठी मनसैनिक सज्ज

नाशिकला राज ठाकरे यांच्यासमोर इच्छुकांच्या मुलाखती

अहमदनगर (प्रतिनिधी): नगर शहर विधानसभेसाठी मनसैनिक सज्ज झाले असून पक्षाने दिलेल्या उमेदवारावर आपले एकमत होईल आणि तो उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व मनसैनिक प्रयत्न करतील अशी ग्वाही नगर शहर विधानसभा मतदार संघासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिली.
नाशिक येथे उत्तर विभागातील विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. त्यावेळी मनसैनिक मोठ्या संख्येने तेथे गेले होते. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यातील बाराच्या बारा विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी त्या ठिकाणी मुलाखती दिल्या. सर्वच मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी होती.
राज ठाकरे यांनी सर्व जिल्ह्याचा आढावा घेऊन सर्वांशी संवाद साधून मार्गदर्शन केलं. निवडणूक लढवण्यासाठी पक्षाची असलेली तयारी आणि रणनीती याविषयी सविस्तर चर्चा त्यांनी केली.
पक्षनेते अभ्यंकर, नार्वेकर, शिदोरे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पदाधिकाऱ्यांकडून मतदार संघाचा आढावा घेतला.
नगर शहरात सुमित वर्मा यांनी मनसे युवा सेना पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल असे आश्वासन दिले.
इच्छुकांच्या यादीमध्ये इंजिनीयर विनोद काकडे, सचिन डफळ आणि ॲड अनिता दिघे यांची नावे होती.
डफळ यांनी सर्व इच्छुक उमेदवार आणि मतदार संघातील परिस्थितिची माहिती वरिष्ठांना दिली. ऍड दिघे यांनी उमेदवारी देताना महिलेला प्राधान्य आणि पक्षाशी निष्ठा याचा विचार करून मला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली.
तर इंजि. काकडे यांनी शहरात दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असून गुन्हेगारी मध्ये वाढ होत आहे. गुन्हेगारी पोसण्यासाठी काही पुढारी सत्तेचा वापर करीत आहेत. एकंदर शहराची वाटचाल विकासा ऐवजी भकास शहराकडे सुरू आहे .
यासारख्या अनेक कारणांमुळं जनता आणि व्यापारी त्रस्त असुन सक्षम पर्यायच्या शोधात आहेत.
नगरकरांनी परिवर्तन करण्याचे ठरविले आहे. माझ्यासारख्या
सक्षम, निर्भिड , सामान्य, सुशिक्षित, मोठा जनसंपर्क आणि नियोजनाची दूरदृष्टी असलेल्या उमेदवारास नगरकर नक्की संधी देतील.
राज ठाकरे यांना आणि महाराष्ट्राच्या विकासा बद्दल त्यांच्याकडे असलेला दृष्टिकोन यावर शहरातील जनतेचा विश्वास आहे. आणि याच्या जोरावर आपण संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटेल असं शहर घडविण्यासाठी प्रयत्नशील राहू याबद्दल ग्वाही दिली.
नगर जिल्ह्यात मनसेची ताकद चांगल्या प्रकारे आहे. राज साहेबांना म्हणणारे त्यांच्या विचारांना साथ देणारे मतदार देखील मोठ्या प्रमाणात आहेत. पक्षाने जर सक्षम उमेदवार दिला तर तो निश्चितच निवडणुकीत आघाडीवर राहून शेवटच्या टप्प्यात जनमत एकवटू शकतो मतांचे विभागणीत आपल्या उमेदवाराची सरशी होऊ शकते असा निष्कर्ष यावेळी निघाला.
आयात उमेदवारापेक्षा आपल्या पक्षाची ध्येयधोरणे आणि विचार माहीत असलेला कार्यकर्ता जर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असला तर त्याला प्राधान्य देण्यात येईल असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा तयारी सुरू करा. उमेदवार कोणताही असो तो निवडून आणणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.
नगर जिल्ह्यात दोन सभा राज ठाकरे यांच्या होतील त्यातील नगर शहरातील सभा ही तर निश्चितच आहे. दुसऱ्या सभेची जागा निश्चित करून उत्तरेत ती दिली जाईल असे नियोजन यावेळी ठरले.
नगर शहरात इंजिनियर विनोद काकडे यांच्या नावाला सर्वांचाच पाठिंबा असून पक्षाने जर संधी दिली तर सचिन डफळ यांनी देखील निवडणूक लढवण्याची तयारी आपली सर्वतोपरी असल्याचे त्यांनी सांगितले.
मनसे नगर शहरात लवकरच रॅपिड ॲक्शन प्लॅन तयार करून मतदारांच्या व्यक्तिगत भेटीगाठी यावर भर देऊन प्रचार जोरात सुरू करणार असल्याचे श्री डफळ यावेळी पदाधिकाऱ्यांना सांगितले.