थंडीनिमित्त शहरातील निराधार महिलांना ब्लँकेटचे वाटप
नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने थंडीनिमित्त शहरातील निराधार महिलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कोठला, राज चेंबर्स येथील फाऊंडेशनच्या कार्यालयात संस्थेचे सचिव मुबीन तांबटकर व ज्येष्ठ संचालक हाजी कादिर सर यांच्या हस्ते महिलांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ. सईद शेख, व्हाईस चेअरमन हाजी गुलाम, खजिनदार हाजी सलीम, संचालक हाजी नजीर, परवेज सय्यद, इंजी. इकबाल सय्यद, हाजी मिर्झा, ॲड. नदीम उपस्थित होते.
2008 पासून अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु आहे. फाऊंडेशन गोरगरीब निराधार लोकांना वैद्यकीय खर्चासाठी व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देत आहे. तसेच संस्थेने शंभर निराधार, अनाथ व विधवा महिलांना दत्तक घेऊन त्यांना दरमहा सहाशे रुपये दिले जात आहे. मागील 16 वर्षापासून हे सामाजिक कार्य सुरु आहे. सर्व संचालक मंडळ या सामाजिक कार्यासाठी योगदान देत असल्याची माहिती संस्थेचे सचिव मुबीन तांबटकर यांनी दिली.