दिल्लीत पुरस्कार मिळाल्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा सत्कार
तांदळी वडगाव व निमगाव वाघात झाला सामाजिक कार्याचा सन्मान
शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून डोंगरे यांनी उभे केलेले सामाजिक कार्य दिशादर्शक -बलभीम कराळे
नगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीचा महात्मा ज्योतीबा फुले फेलोशिप नॅशनल अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचा श्री धर्मनाथ विद्यालय तांदळी वडगाव व निमगाव वाघा (ता. नगर) येथे सत्कार करण्यात आला.
तांदळी वडगावच्या श्री धर्मनाथ विद्यालयात मुख्याध्यापक बलभीम कराळे तर निमगाव वाघा येथे सोसायटीचे संचालक अतुल फलके यांनी डोंगरे यांचा सत्कार केला. यावेळी तांदळी वडगावचे रमेश सुपेकर, सरोज पवार, गोरक्ष निकम, जनार्धन ठोंबरे, जयसिंग उबाळे, बाळासाहेब शिंदे, अशोक पवार, निमगाव वाघाचे सुभाष शिंदे, सोसायटीचे संचालक अजय ठाणगे, पिंटू जाधव, दत्ता ठाणगे, सचिन जाधव, रघुनाथ डोंगरे, तुकाराम फलके, तानाजी काळे, स्वराज डोंगरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्याध्यापक बलभीम कराळे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून नाना डोंगरे यांनी उभे केलेले सामाजिक कार्य दिशादर्शक आहे. निस्वार्थपणे विविध क्षेत्रात त्यांचे योगदान सुरु असून, गाव पातळीवर अनेक खेळाडू त्यांनी घडविले आहे. सेवा कार्यातून डोंगरे यांनी गावचे नाव उंचावले असल्याचे त्यांनी सांगितले.
अतुल फलके म्हणाले की, युवकांसाठी डोंगरे यांचे कार्य दिशादर्शक आहे. गावातील राजकारणापासून लांब राहून ते समाजकारण करत आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार हे गावासाठी भूषणावह असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे यांनी सर्वांच्या सहकार्याने समाजकार्य सुरु असून, सर्वांना बरोबर घेऊन विविध क्षेत्रात योगदान सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.