श्री एकदंत गणेश मंदिराच्या वतीने श्रीराम मंदिर वर्षपूर्ती सोहळानिमित्त महाप्रसाद वाटप

 नगर- दातरंगे मळा येथील एकदंत कॉलनी मधील श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने श्री राम लल्ला अयोध्या येथील श्रीराम मंदिर वर्षपूर्ती सोहळा भाविकांना महाप्रसाद वाटप करून साजरा करण्यात आला.
        अयोध्या येथील श्रीराम मंदिरास वर्षपूर्ती झाल्या निमित्ताने दातरंगे माळा येथील श्री एकदंत गणेश मंदिरात महाआरती करून तसेच प्रभू श्रीरामांना आणि श्री गणरायाला 21 भोग नैवेद्य देण्यात आले. तसेच यावेळी दीड हजार लोकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी महाप्रसाद म्हणून मसाला भात आणि शिरा ठेवण्यात आला होता.
    श्री एकदंत महिला मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांच्या हस्ते महाआरती करून या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.  महाआरती झाल्यानंतर महिलांनी  पद्मशाली समाजामध्ये प्रसिद्ध असलेले  सांस्कृतिक  ‘बक्ताम्मा’  खेळला. यावेळी परिसरात जय श्रीराम आणि गणपती बाप्पा मोरया या नामघोषाने परिसर दुमदुमला होता. मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.भाविकांनी मोठ्या आनंदाने या कार्यक्रमात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.