एमआयडीसी सनफार्मा चौक येथे शेडची मोडतोड करुन नुकसान
अज्ञातव्यक्ती विरोधात गुन्हा दाखल
अहमदनगर (वैष्णवी घोडके)
नगरच्या एमआयडीसी मधील सनफार्मा चौक येथे कोंबड्याची विक्री करण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेडची मोडतोड करुन लोखंडी पिंजरा व ताडपत्रीचे नुकसान करण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये शेडचे मालक अजय मल्हारी चांदणे (रा. नागापूर) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञातव्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही पहा आणि सब्सस्क्राइब करा.
एमआयडीसी मधल्या सनफार्मा चौक येथे कोंबड्यांच्या विक्रीसाठी शेड उभारण्यात आलेले होते. गुरुवार दि.12 ऑगस्ट रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने दहा हजार रुपये किंमतीच्या शेडची मोडतोड करुन इतर साहित्याचे नुकसान केले. फिर्यादी चांदणे यांनी सदर प्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. चांदणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली.