ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने देशा विरोधी मनुवादी धोरणाचे दहन व संविधान राष्ट्र बचाव आंदोलन

ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या जिल्हा अध्यक्ष योगेश थोरात समवेत युवक जिल्हा उपाध्यक्ष सागर ठोकळ, तालुका अध्यक्ष प्रकाश कांबळे, अण्णासाहेब गायकवाड, निखिल शिंदे, निखिल थोरात, नवीन भिंगारदिवे, जीवन कांबळे, शुभम बडेकर, स्वप्नील खरात, किरण दत्ताशिव, विकी थोरात, सागर शिंदे, सोनू ठोकळ, तेजस शिंदे, कृष्णा आंधळे, सागर गायकवाड, सुजित आरवडे, स्वप्निल भिंगारदिवे आदीसह अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा अध्यक्ष योगेश थोरात म्हणाले की ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने देशा विरोधी मनुवादी धोरणाचे दहन व संविधान राष्ट्र बचाव आंदोलन संविधान दिनानिमित्त पुकारण्यात आले आहे यामध्ये ईव्हीएम धोरण मुर्दाबाद म्हणून सरकारी कंपन्या धोरण, धार्मिक दहशतवाद, दलित आदिवासी धोरण, बेरोजगारी धोरण, शेतकरी काळे कायदे, महिला अत्याचार धोरण यासंदर्भात निषेध नोंदवून आंदोलन करण्यात आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भारताला संविधान दिले आहे या संविधानामुळे देशात मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार दिला असून संविधानामुळे जगाला प्रकल्प लोकशाहीची प्रचिती आणली व सर्वसामान्य मतदारांच्या हातात देशाची सूत्रे आली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली असून वरील धोरणाचे निषेध व्यक्त क्या करण्यात आले. व ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने संविधान दिनानिमित्त रक्तदान शिबीर देखील युवकांनी मोठ्या प्रमाणात केले आहे.