अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळेत भरविण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन बायोटेक्नॉलॉजी विषयाचे प्राध्यापक संजय मोहरीकर यांच्या हस्ते झाले.
चंद्रशेखर रामन, बिरबल साहनी, एपीजे अब्दुल कलाम, होमी भाभा आदी भारतीय वैज्ञानिकांच्या वेशभुषेत अवतरलेल्या बालवैज्ञानिकांनी सर्वांची लक्ष वेधली.
संस्थेचे विश्वस्त अॅड. गौरव मिरीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिकाला चालना देण्यासाठी चंद्रशेखर रामन यांच्या जीवनपटावर आधारित चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात पर्यावरण संवर्धन, जल शुध्दीकरण, पाणी बचत, सौर ऊर्जेचा वापर आदी विविध विषयावर प्रकल्प मांडण्यात आले होते.