मराठा क्रांती मोर्च्याचे नगर शहरामध्ये स्वागत

मराठा आरक्षणाबाबत राज्यसरकारला जाब विचारण्यासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे .  मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होत.

औरंगाबादहून आलेल्या मोर्च्याचे स्वागत करण्यात आले. औरंगाबादहून नगर शहरामध्ये हा मोर्चा उतरला .  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून,झेंडे फडकावून,  घोषणा देण्यात आल्या.

यावेळी दत्ताभाऊ वामन , बापू ठाणगे,कैलास गहिले, पोपट कांडेकर , अमोल हुंबे, केशव बरकते, विशाल बेरड , किरण उंडे,पप्पू बेरड, भैय्या पठाण किशोर कुलट व रमेश केरे पाटील , किशोर शिरवळ पाटील , माणिक शिंदे पाटील , डांगे पाटील , सुरेखा सांगळे . आशाताई केरे पाटील , विजया मराठे , भारती पवार , गौरी चव्हाण ,आदी उपस्थित होते.
२८  फेब्रुवारी रोजी औरंगाबाद गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथील शहीद काकासाहेब शिंदे यांच्या स्मारक स्थळावरून  हा मोर्चा निघाला होता.मुंबईतील मंत्रालयावर चार चाकी वाहनांचा लाँग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांनी दिली आहे.