जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अभियंता यांना निवेदन
नगर -जामखेड रोडवर नगर शहरापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर असनाऱ्या, जामखेड नाका परिसरात रोडच्या दोन्ही बाजूस पाचशे मीटरच्या अंतरावर मागील 2 वर्षांमध्ये अनेक गाळे बांधण्यात आली आहेत. सदरची दुकाने गाळे, ही खाजगी मालकीची असून, त्यांचे बांधकाम हे शासनाच्या हद्दीत असणाऱ्या नगर जामखेड रोडच्या शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधली गेलेली आहेत.
मुख्य म्हणजे या दुकानांचे फलक हे रोड पासून अगदी एक ते दोन मीटर अंतरावर आहेत. परिणामी त्या ठिकाणी टू व्हीलर पार्किंग करणे सुद्धा अवघड झाले आहे, एखादि व्यक्ती अचानक वाहनाच्या समोर आल्याने त्या ठिकाणी वारंवार छोटे-मोठे अपघात होत असतात. मागील आठवड्यामध्ये एक आर्मी अधिकाऱ्याचा अपघात होऊन तो कोमा मध्ये जाऊन त्याचा मृत्यू झाला असून सदरील रस्त्यावरच्या अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे …
व मागील दोन वर्षांपूर्वी याच नगर जामखेड रोडचे सुमारे 21 कोटी रुपये खर्च करून आपल्या विभागाअंतर्गत डांबरीकरण करण्यात आले आहे. परंतु या रोडवर पाच ते सहा ठिकाणी मोठ्या स्वरूपाचे खड्डे पडलेले आहेत. त्यातच सदर रोड ची रुंदी कमी असल्या मुळे बाकीचा रोड हा चांगल्या प्रतीचा असल्यामुळे वाहनांना रात्रीच्या वेळी हे खड्डे समजून येत नाहीत त्यामुळे सातत्याने त्या खड्ड्यांमध्ये दुचाकीस्वारांचा अपघात होत आहे. यात मागील दोन ते तीन महिन्यात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत,तसेच वेगवेगळ्या अपघातात होत असून दोन निष्पाप व्यक्तींनी आपला प्राण गमावलेला आहे.
जामखेड नाक्यावरील सर्व अतिक्रमित बांधकामे तातडीने काढावीत. तसेच संपूर्ण रस्ता रुंदीकरण हे शासकीय नियमात करावे. तसेच जे काही खड्डे पडलेले आहेत त्याचे व्यवस्थित पॅचींग करून रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अभियंता यांना निवेदन देण्यात आले .
यावेळी जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत विजय मिसाळ, अमित गांधी, दीपक गुगळे, गौतमीताई भिंगारदिवे, मंगल पालवे, शहानवाज शेख आदीसह उपस्थित होते.