थकबाकीदारांना मिळणार दंडाच्या रकमेत 75 टक्के सूट
मनपा आयुक्तांचा निर्णय 9 डिसेंबर पर्यंतच मुदत
मालमत्ता कर व पाणीपट्टीची 50 हजार रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या 51 ते 536 थकबाकीदारांना महापालिकेने दंडाच्या रकमेत 75 % सवलत जाहीर केली होती. आता सरसकट सर्व थकबाकीदारांसाठी ही सवलत लागू करण्याचा निर्णय आयुक्त पंकज जावळे यांनी घेतला आहे 9 डिसेंबर पर्यंतच ही मुदत असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. चालू वर्षात 191.59 कोटी रुपये थकबाकी व 53.57 कोटी रुपये नवीन मागणी. अशी एकूण 235.16 कोटींची मागणी होती. त्यापैकी 55% मालमत्ता धारकांनी 31.17 कोटी रुपये भरले, तर 45% मालधारकांनी 213.99 कोटी रुपये थकवले आहेत. दरवर्षी निम्मेच करत आहे. कर भरत असल्याने वसुलीचे प्रमाण घटवून 13 टक्क्यांवर आले आहे. थकित वसुलीसाठी मनपाने 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या लोक अदालत मध्ये 50 हजारांपर्यंत थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांची प्रकरणे ठेवली होती, त्यांना दंडाच्या रकमेत 75% सवलत दिली आहे.