मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा
जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर मध्ये गारपीटीची शक्यता
पुणे राज्यात वळवाच्या सरींनी हजेरी लावल्याने उन्हाचा चटका काही अंशी कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात, येत्या बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा तर जळगाव नाशिक, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा दिला आहे. कोकणात उष्ण लाटेचा इशारा हवामान खात्याने मंगळवारी दिला. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये मुंबई, नगर, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. तुरळक ठिकाणी गारपीट झाली. ढगाळ आकाशामुळे उन्हाचा चटका कमी होत असून कमाल तापमान कमी अधिक होत आहे. राज्यात ब्रह्मपुरी येथे उच्चांक 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आग्नेय अरबी समुद्रात केरळ जवळ चक्राकार वाऱ्यांचे स्थिती आहे. त्यापासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण कर्नाटक परिसरावरील चक्रार वाऱ्यांची स्थिती वरील कमी दाबाच्या पट्ट्यावर विरून गेली आहे. बुधवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तर जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात गारपिटीचा इशारा दिल्या दिला आहे. कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेचा इशारा दिलेला आहे.