लोणावळ्याजवळ एकाच कुटुंबातील चार मुलांसह, एक महिला वाहून गेली
भुशी धरणाजवळची दुर्घटना दोन मृतदेह अजून प्रतीक्षेत
लोणावळ्यातील भुशी धरणातील धबधब्याच्या प्रवाहात दिसण्याचा आनंद लुटणारे एकाच कुटुंबातील पाच जण कालबाहून गेले. रविवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. नूर, अमिना , मारिया, अन्सारी आणि अदनान हे पाच जण यामध्ये वाहून गेले. यापैकी नूर,आणि अमिना, मारिया असे तिघांचे मृतदेह सापडल, असून इतर दोघांच्या मृतदेहांचा शोध सुरू आहे. रेल्वेच्या विश्रांतीगृह भागातील डोंगरातून वाहणाऱ्या धबधब्याच्या प्रवाहात 15 ते 17 जण वर्षाविहाराचा आनंद घेत होते. अन्सारी परिवारातील चार मुले भिजण्याचा आनंद लुटत असताना वाहून गेली. त्यांच्या बचावासाठी शाहिस्ता शेख पाण्यात उतरल्या. पण पाण्याचा वेग जास्त असल्याने त्याही त्या प्रवाहात वाहून गेल्या यावेळी इतरांनी आरडाओरड केली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही