राष्ट्रवादी सांस्कृतिक विभाग पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान.

राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाने समाज प्रबोधन करावे :- राजेंद्र फाळके.

ऋषिकेश राऊत 

अहमदनगर (प्रतिनिधी) :- 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या  सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आपल्या कला कौशल्याचा उपयोग समाजप्रबोधनासाठी करावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले.

राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य व तालुकाध्यक्ष यांना नियुक्तीपत्राचे वितरण राष्ट्रवादी भवनमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. किसनराव लोटके, सरचिटणीस प्रा. सिताराम काकडे, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. श्याम शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून अत्यंत चांगले व्यासपीठ आपल्या सर्वांना मिळाले आहे. या संधीचे सर्वांनी सोने करावे तसेच ज्येष्ठ कलावंत मानधन समितीच्या माध्यमातून वंचित कलावंतांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, असे ते म्हणाले.

राजेंद्र फाळके यांच्या हस्ते सांस्कृतिक विभागाचे नवनियुक्त कार्याध्यक्ष भगवान राऊत, सरचिटणीस रियाज पठाण, प्रवक्त्या डॉ. रत्ना वाघमारे, उपाध्यक्ष शिवशाहीर कल्याण काळे, हसन शेख पाटेवाडीकर, शाहीर दिलीप शिंदे, संघटक प्रा. डॉ. संदीप सांगळे,  चिटणीस अजयकुमार पवार, शिवानंद भांगरे, जयश्री जगताप, संघटक सचिव शहाजहान तांबोळी, सदस्य राधाकृष्ण कराळे, जामखेड तालुकाध्यक्ष दिपक तुपेरे, नगर तालुकाध्यक्ष बाबासाहेब डोंगरे, पारनेर तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पटेकर, पाथर्डी तालुकाध्यक्ष जनार्धन बोडखे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष संदीप कदम, आदींना यावेळी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी भारुड सम्राट हमीद सय्यद यांना आर्ट बीट फाउंडेशनचा ‘कलारत्न पुरस्कार’ मिळाल्याबद्दल, शिवशाहीर कल्याण काळे यांची जेष्ठ कलावंत मानधन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रा. किसनराव लोटके, प्रा. सिताराम काकडे, प्रा. डॉ. संदिप सांगळे, शिवशाहीर कल्याण काळे, हसन शेख पाटेवाडीकर, शाहीर दिलीप शिंदे, जयश्री जगताप, प्रा. डॉ. रत्ना वाघमारे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. भगवान राऊत यांनी प्रास्ताविक केले. डॉ. श्याम शिंदे यांनी सांस्कृतिक विभागाची भूमिका मांडली. रियाज पठाण यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रा. डॉ. रत्ना वाघमारे यांनी आभार मानले.या बैठकीस शाहीर वसंत डंबाळे, अविनाश बोधले, केरू पटेकर, प्रसाद चव्हाण, भाऊसाहेब मनाळ, गोकुळदास बैरागी, चंद्रशेखर आंधळे आदी उपस्थित होते.