आई हेच माझे विद्यापीठ होते. :- ॲड.डॉ. अरुण जाधव.

आईने काबाड कष्ट करून आम्हाला घडविले, गोर गरीब शोषित पीडितांना मदत करण्याची शिकवण दिली.

जामखेड (प्रतिनिधी):- आईने काबाड कष्ट करून आम्हाला घडविले, गोर गरीब शोषित पीडितांना मदत करण्याची शिकवण दिली. आमच्यावर चांगले संस्कार केले. त्यामुळेच आज आम्हाला समाजात स्वाभिमानाने जगता आले. आई हेच माझे विद्यापीठ होते. असे प्रतिपादन ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक ॲड.डॉ. अरुण जाधव यांनी केले. ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक तथा वंचित बहुजन आघाडीचे भटके विमुक्तांचे नेते ॲड.अरुण जाधव यांच्या मातोश्री दिवंगत लोककलावंत हिराबाई जाधव यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित प्रबोधनपर कार्यक्रमात ते बोलत होते. ह.भ.प. विश्वनाथ महाराज नन्नावरे, ह. भ. प. कांताबाई सोनटक्के, ह. भ. प.सारिका ताई देवकाते, प्रा मधुकर राळेभात, नगरसेवक अमित जाधव, गुलचंद अंधारे, विद्या ताई वाव्हळ, राजेश वाव्हळ, मोहन गायकवाड, नेरले ग्रामपंचायत सदस्य शरद काळे, सर्जेराव काळे, गोविंद सातपुते, उद्योजक अनुप काळे, अरुण डोळस, ग्रामीण विकास केंद्राचे संचालक बापु ओहोळ, अलका ताई जाधव, उमाताई जाधव, उषाताई जाधव, नीरज जाधव, गौतमी जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना ॲड. अरुण जाधव पुढे म्हणाले की, आम्ही गाव कुसाबाहेर राहणारी माणसं मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आम्हाला मान सन्मान मिळाला. आईच्या प्रेरणेमुळे संघर्ष करण्याची ताकद मिळाली. लढण्याचे बळ मिळाले. त्यामुळेच आज समाजात ताठ मानेने जगू शकतो. प्रत्येकाच्या जीवनात आईचे स्थान अढळ असते. त्यामुळे सर्वांनी आईची सेवा करावी. व आईचे स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र कष्ट करावे.

Also see this and subscribe 

ह. भ.प. कांताबाई सोनटक्के म्हणाल्या की, सर्व तीर्थांचे माहेरघर म्हणजे आई असते. ॲड.अरुण जाधव आईला आपण कुठली उपमा देऊ शकणार आईने आपल्यावर केलेले उपकार आपण जन्मभर फेडू शकणार नाही मात्र आपल्या आईने आपल्याला दिलेले संस्कार व शिकवणुकीनुसार आपण जीवनची वाटचाल केली पाहिजे. ह.भ.प.विश्वनाथ महाराज नन्नावरे म्हणाले की, आई आपल्याला सोडून गेल्या नंतर प्रत्येकाला आपल्या आईची कमतरता भासत असते. मात्र आई वडील हयात असतांनाच त्यांची सेवा करणे म्हणजेच चारधाम ची यात्रा करणे होय. ह. भ.प. सारिका देवकाते यांनी आईचे वर्णन करणारे गीत सादर करून आईची महती आपल्या मनोगतातून व्यक्त केली.

यावेळी प्रा. मधुकर राळेभात, बापू ओहोळ, अरुण डोळस यांनी प्रतिनिधीक स्वरूपात श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या मातोश्री दिवंगत लोककलावंत हिराबाई जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ ह. भ.प. कांताबाई सोनटक्के व ह.भ.प. विश्वनाथ महाराज नन्नावरे यांच्या आश्रमास ३१०० रुपयांची देणगी देण्यात आली. तसेच ल.ना. होशिंग विद्यालय व नागेश विद्यालयातील १० वी १२ वी च्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थिनींना हिराबाई जाधव स्मृती पारितोषिक देण्यात येणार असल्याची घोषणा ॲड.अरुण जाधव यांनी यावेळी केली.

दिवंगत लोककलावंत हिराबाई जाधव यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या प्रबोधनपर कार्यक्रमास प्रारंभ झाला. भगवान राऊत यांनी प्रास्तविक व सुत्रसंचालन केले. ॲड.अरुण जाधव उमाताई जाधव यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प समन्वयक सागर भांगरे, निवारा बालगृहाचे अधीक्षक वैजीनाथ केसकर, तरडगावच्या सरपंच संगीता ताई केसकर, संतोष चव्हाण, संतोष भोसले, दिसेना पवार, विशाल पवार, अतिष पारवे, मनीषा काळे, लता सावंत, उज्वल मदने, छाया भोसले, दिपक माळी, विशाल पवार, मच्छीन्द्र जाधव, मोहन जाधव, तानाजी जाधव, विशाल जाधव, जित जाधव, गौतमी जाधव, आदींनी परिश्रम घेतले.

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.