‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवाानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सव

बालगंधर्व कलादालनात व्यंगचित्र आणि अर्कचित्राचे प्रदर्शन

प्रबोधनकारांमुळे महाराष्ट्रात स्त्रीयांची प्रगती झाली. प्रबोधनकार म्हणजे राजकारण आणि समाजकारणाचा सेतु होता आणि त्याच्या विचारांची कास धरुन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सर्व घटकाकरता काम करत आहे अस मत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी व्यक्त केल.ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवाानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाअंतर्गत बालगंधर्व कलादालनात व्यंगचित्र आणि अर्कचित्राचे प्रदर्शन भरविण्यात आले असून त्याचे उद्घाटन  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते करण्यात आल. यावेळी संवाद पुणेचे सुनील महाजन, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, प्रबोधन युवा शक्तीचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक, सचिन इटकर, ज्येष्ठ पत्रकार हरिश केंची, किरण साळी यांची प्रमुख उपस्थिती होती.  शिवसेनाप्रमुख यांची छायाचित्रे, मार्मिकमधील व्यंगचित्रे, प्रबोधनचे अंक आणि प्रबोधनकार, शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ग्रंथांचे प्रदर्शन तसेच प्रबोधनकारांच्या विविध पुस्तकातील त्यांचे विचारदर्शन घडविणारी ‘प्रबोधनी विचारांच्या ठिणग्या’ ही मालिका, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘कार्टून कट्टा’चे घनश्याम देशमुख, विनय चाणेकर यांच्यासह देशातील 75हून अधिक व्यंगचित्रकारांच्या ‘आमचेही फटकारे’ या व्यंगचित्र व अर्कचित्रांचा प्रदर्शनात समावेश आहे. हे प्रदर्शन बालरंग मंदिराच्या कलादालनात 26 जानेवारी पर्यत पुणेकरांना पाहता येणार आहे. पुणे विद्यापीठामध्ये  अडीच ते तीन हजार व्यंगचित्रांचे दालन तयार आहे, कोविडच्या संकटामुळे त्याचे उद्घाटन होऊ शकलेले नाही.  प्रबोधनकारांनी दाखविलेल्या वाटेवरून चालत असताना जी दोन अध्यासने केली आहेत ज्यात अनुसूचित जातीच्या सामाजिक प्रश्नांसाठी अभ्यासकेंद्राची सुरुवात केली आहे. मराठा साम्राज्याचे इतिहास केंद्रही पुणे विद्यापिठामध्ये सुरू केले असल्याचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी यावेळी सांगितले.