जस्मित वधवा यांच्या 2 जी राईडसाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिल्या शुभेच्छा …

अहमदनगर :

दिल्ली ते मुंबई दरम्यान १९ ते २४ डिसेंबरला होणार्‍या जी-टू-जी सायकल राईडमध्ये नगरचे उद्योजक जस्मित वधवा यांनी सहभाग नोंदविला आहे.  या राईडमध्ये संपूर्ण देशातून फक्त ४० जणांनी सहभाग घेतला आहे.   या राईडमध्ये १ हजार ४६० किलोमीटरचे अंतर पाच दिवसांमध्ये सायकलवर पूर्ण केले जाणार आहे.  जी-टू-जी म्हणजे दिल्ली येथील इंडिया गेट ते मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाचा, असा सायकलप्रवास !  यात दररोज २८० किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्याचे आव्हान नगरचे जस्मित वधवा यांच्यासमोर असणार आहे.

 शून्य डिग्री ते ४० डिग्री तापमान, वाहतूक, रस्ता या सर्व बाबींचा त्यांना सामना करावा लागणार आहे.  अभियंता असलेले जस्मित यांनी  या सायकल राईडमध्ये गरिबांसाठी ना नफा-ना तोटा तत्त्वावर मेडिकलचे दालन सुरू करण्याचा संकल्प केला आहे. जस्मित वधवा यांच्या या सायकल राईडसाठी  जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत या राईड बद्दल सर्व माहिती घेतली.

हि राईड जस्मित यशस्वीपणे पूर्ण करणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी दाखवत नगरच्या  इतिहासात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असल्याचे मत जस्मित यांनी व्यक्त केले आहे. य लव्ह नगरचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि तिरंगा फाऊंडेशने त्यांना या कार्यासाठी  शुभेच्छा दिल्या आहेत.