भिंगार महापालिकेत महिन्यात मंजुरी मिळावी
भिंगार महापालिकेत महिन्यात मंजुरी मिळावी
पाणी प्रशासन मूलभूत विकास रखडल्यामुळे भिंगारच्या अहमदनगर महापालिकेत समावेश करावा अशी मागणी भिंगार येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहात याबाबत संरक्षण मंत्री यांच्याशी चर्चा देखील करण्यात आली आहे स्थानिकांना सुविधा पुरवण्यासाठी भिंगार छावणी परिषद विसर्जित करून येत्या तीन महिन्यात अहमदनगर महापालिकेत भिंगार शहराचा समावेश करण्यात यावा अशी मागणी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडली ४ डिसेंबर पासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात गुरुवारी दिनांक ७ खासदार विखे यांनी भिंगार छावणी परिषदेच्या अहमदनगर महापालिकेत समावेश व्हावा असे मत मांडले विकी म्हणाले भिंगार छावणी परिषदेचे स्थापना 1979 मध्ये स्थापन झाली येथे सुमारे 25000 लोक वास्तव्यास आहेत मात्र भिंगार छावणी परिषद लष्करांच्या अधिपत्याखाली येत असल्याने येथील नागरिकांना मोठ्या समस्यांना समोर जावे लागत आहे पिण्याचे पाणी बांधकाम मजूर तसेच स्थानिक मूलभूत सुविधा देताना अनेक समस्या येत आहेत यामुळे भिंगारचा समावेश नगर महानगरपालिकेत समावेश करण्यात यावा अशी मागणी नागरिकांची आहे त्यामुळे लवकरात लवकर भिंगारचा समावेश अहमदनगर महापालिकेत करण्यात यावा अशी मागणी विखे यांनी केली