एमपीएससी नावालाच भरती खाजगी तूनच

एमपीएससीच्या मार्फत पदभरतीची अंमलबजावणी केव्हा?

एमपीएससी नावालाच भरती खाजगी तूनच
एमपीएससीच्या मार्फत पदभरतीची अंमलबजावणी केव्हा?
शासकीय सेवेतील घटक क मधील पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एमपीएससी राबवण्यासाठी सेवा प्रवेश नियमित सुधारणा करण्यासंदर्भात वर्षभरापूर्वी निर्णय घेऊनही प्रशासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणीच झालेली नाही त्यामुळे अद्यापही शासकीय भरती प्रक्रिया खाजगी कंपन्यांमार्फत सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शासकीय सेवेतील घटक मधील लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे एमपीएससी तर्फे भरण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने दोन नोव्हेंबर 2022 रोजी घेतला केरळ लोकसेवा आयोगाच्या धरतीवर राज्यातही लिपिक टंकलेखक पदे वगळून उर्वरित पदे, एमपीएससीच्या कक्षेत आणण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग विनिमय 1965 चा नियम तीन मध्ये दुरुस्ती व सेवा प्रवेश नियमित सुधारणा करण्याची कार्यवाही मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने सुरू करावी असे या निर्णयात नमूद केले आहे त्या संदर्भात कार्यवाही झाली नसल्याने अजूनही या पदांची भरती प्रक्रिया खाजगी कंपनीमार्फत राबवली जात आहे