पेट्रोल,डिझेल,गॅस व ऑटोरिक्षाचा इन्शुरन्स मध्ये केंद्र सरकारने वाढ

काळे फिती लावून व रिक्षाला काळे झेंडे लावून निषेध व्यक्त.

देशामधील पेट्रोल डिझेल गॅस व ऑटो रिक्षा चा इन्शुरन्स मध्ये केंद्र सरकारने वाढ केलेली आहे ती वाढ सरकार मागे घेत नाही याच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने काळा फिती लावून व काळे झेंडे रिक्षाला बांधून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आमदार संग्राम जगताप, संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, उपाध्यक्ष दत्ता वामन, प्रमुख सल्लागार विलास कराळे, लतीफ शेख, गणेश आटोळे, नसीर खान, कयूम सय्यद, राजू काळे, रघुनाथ कापरे, सुनील खरपे, नासिर सय्यद, निलेश कांबळे, शाहरुख शेख, गोरख खांदवे, गणेश पवार, निलेश लवांडे, राजू टापरे, निसार शेख आदीसह रिक्षाचालक उपस्थित होते.

 

 

हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा 

 

 

गेल्या दोन वर्षापासून केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल गॅस व ऑटो रिक्षा चा इन्शुरन्स व ऑटो रिक्षा परवाना मध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे पूर्वी ऑटोरिक्षा परवानाची फी २०० रुपये एवढी होती ती आज १० हजार रुपये झालेली आहे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये रिक्षाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे ड वर्ग महापालिका नगरपालिका ग्रामीण भाग येथे रिक्षाचा व्यवसाय अत्यंत कमी प्रमाणात आहे म्हणून अशा भागांमध्ये जास्तीत जास्त 1हजार रुपये परवाना फी ठेवावी ऑटो रिक्षाचा विमा फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे

 

 

 

 

 

 

रिक्षाचालकांना विम्याचा कुठलाही फायदा नाही कारण एक टक्का पण विम्याचे क्लेम होत नाहीत त्यामुळे रिक्षाचालकांना व्यवसाय करणे परवडत नाहीत केंद्र सरकार पेट्रोल व डिझेल गॅस व इन्शुरन्स मध्ये केलेली वाढ मागे घ्यायला तयार नाहीत म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील रिक्षा चालक काळे फिती व रिक्षाला काळे झेंडे लावून केंद्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करणार असल्याचे सांगितले.