नाताळ सणानिमित्त कोठी परिसरात मनपाने स्वच्छता करण्याची मागणी- स्वप्निल शिंदे.

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्टेशन रोड येथील कोठी परिसरात  नाताळ सणानिमित्त स्वच्छता  करण्याच्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिंदे यांनी मनपा प्रशासनाला केली असून
नाताळ सण हे ४ ते ५ दिवसावर आले आहे. परंतु सदर परिसरात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत उगलेले आहे. कोठी परिसरातील क्रांती चौक ते इंदिरानगर येथील रस्ता देखील खराब झालेला असून महापालिकेच्या मार्फत मुरूम टाकण्यात यावा तसेच कोठी चौकात मुतारी असून या ठिकाणी साफसफाई होत नाही व अनेक वेळा महापालिकेत अर्ज सादर करून सुद्धा साफसफाई होत नसून याकडे कोणतेही कर्मचारी लक्ष देत नाही त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामूळे चांगल्या प्रकारे संपूर्ण परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी तसेच क्रांती चौकातील पुरुष शौचालय देखिल तुब्लेले असून तेथे सेफ्टी टॅंक ने घाण काढण्यात यावी तसेच या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्याकडे लक्ष देण्यात यावे तसेच मार्केट यार्ड रोड येथे माती व कचरा साचले असून महापालिकेमार्फत त्वरित काढण्यात यावे तसेच संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी. कोठी परिसरात मोठ्या उत्साहाने नाताळ ख्रिसमस सन हा साजरा करण्यात येत असून लवकरात लवकर महापालिकेने साफसफाई कर्मचारी तेथे लावून या ठिकाणी घाण साफ करून औषध फवारणी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिंदे यांनी केली आहे.