ऑटो रिक्षा जप्तीच्या नोटिसा न काढता परवाना फी मुदतवाढ देण्याची मागणी.
अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांचे निवेदन.
अहमदनगर
अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने ज्या रिक्षा चालकांची परवाना फी १० हजार रुपये भरलेली नाही अशा रिक्षाचालकांना परिवहन खात्याने १० हजार रुपये फी भरण्यासाठी रिक्षा जप्तीच्या नोटिसा पाठवल्या आहेत 2020 पासून कोरोना मुळे लॉकडॉऊन असल्याने रिक्षाचालकांचे व्यवसाय बंद होते.
हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा :
त्यामुळे तेही आज भरू शकत नाही तरी त्यांना मुदत वाढ द्यावी या मागणीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना निवेदन देताना अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अविनाशतात्या घुले समवेत प्रमुख सल्लागार विलास कराळे, उपाध्यक्ष दत्ता वामन, सचिव अशोक औषीकर, सहसचिव लतीफ शेख, गणेश आटोळे, कयूम सय्यद, आरिफ शेख, ईश्वर शेलार, फारुक शेख, धणेश गायकवाड, दत्ता जाधव, सचिन गवळी आदी उपस्थित होते.
२०१४ मध्ये परवाना फी २०० रुपये होती ती आज १० हजार झालेली आहे ही फी प्रशासनाने कमी करावि व ऑटो रिक्षा चालकांना न्याय द्यावा. तसेच कोरोना काळात शासनाने मदत म्हणून १५०० रुपये परवाना धारक रिक्षा चालकास मिळविण्याकरीता तांत्रिक अडचणी येत असून रिक्षाचालकांच्या खात्यात पैसे जमा होत नाही व एखाद्या रिक्षाचालकाने पुण्यावरून रिप्लेस वर रिक्षा सीएनजी घेतल्यास ती रजिस्ट्रेशन अहमदनगर मध्ये होत नाही. आणि अहमदनगर शोरूम मधून सीएनजी रिक्षा घेतल्यास ती रजिस्ट्रेशन होते याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.