आता डेंग्यूची चिंता नाही ,लढाईला मिळाले यश

दुसऱ्या लसीला डब्ल्यू एच ओ ने दिली मान्यता

यंदा अमेरिकेत पसरलेल्या डेंग्यूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने डेंग्यूवरील दुसऱ्या लसीला बुधवारी मान्यता दिली. त्यामुळे साथीच्या या आजाराविरोधात लढण्यासाठी आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. जपानच्या टाकेडा या औषध निर्मिती कंपनीने विकसित केलेल्या लसीचे नाव डेंगा असे आहे. विशेषतः डेंग्यू प्रभावित देशातील 6 ते 16 या वयोगटातील रुग्णांना ही लस देण्याची शिफारस करण्यात आली आहे. या लसीचे दोन डोस डेंग्यूच्या चार प्रकारांवर मात करण्यासाठी सक्षम सक्षम आहे. यापूर्वी 2022 मध्ये त्यास युरोपियन मेडिसिन एजन्सीने मान्यता दिली होती.