दरवर्षी किल्ले देवगिरीवर स्वराज्य प्रेरणा दिन साजरा करणार : राहुल भोसले

स्वराज्य तोरण प्रतिष्ठान, पुणेची घोषणा.

अहिल्यानगर, दि.17 सावेडीतील कोहिनुर मंगल कार्यालय येथे स्वराज्य तोरण समिती महाराष्ट्र राज्यची बैठक संपन्न दि. 16 रोजी संपन्न झाली. त्यामध्ये दरवर्षी 25 जुलै हा दिवस किल्ले देवगिरी येथे “स्वराज्य प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला.या बैठकीचे आयोजन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नितीन उदमले यांचे मार्फत करण्यात आले होते. या बैठकी साठी भाजपा नेते प्रा. भानुदास बेरड, युवराज पोटे, मनोज दुल्लम, नगरसेवक संग्राम शेळके, हिंदू राष्ट्र सेना जिल्हाअध्यक्ष संजय आडॊळे, हिंदू जागृती समितीचे रामकृष्ण भुकन, शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख बापू ठाणगे, रवि निगुडे यांचे सह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीस छत्रपती संभाजी नगर येथील शिवव्याखाते व लेखक ऍड शंकर जाधव यांनी देखील मार्गदर्शन केले. या बैठकीत बोलताना राहुल भोसले म्हणले,स्वराज्य ज्या महान योध्याच्या बलिदानावर त्यागावर उभा राहिले आहे तचे स्मरण आपण सतत करत राहिले पाहिजे. शिवजयंती व शिव राज्याभिषेक आपण मोठ्या प्रमाणावर साजरा करतो मात्र बलिदानाचे प्रसंग आपण विसरून गेलो आहोत की काय असे वाटते. त्या पैकीच एक महत्वाची घटना सन २५ जुलै १६२९ रोजी घडली.तो आई जिजाऊंच्या आयुष्यातील काळाकुट्ट दिवस.जिजाऊंचे वडील लखोजीराजे, दोन सख्खे भाऊ अचलोजी आणि रघुजी, एक भाचा यशवंतराव यांची देवगिरी किल्ल्यावर विश्वासघाताने निजामाने कत्तल केली.विश्वासघाताने केलेल्या या हत्तेचा मोठा परिणाम जिजाऊ माँ साहेबांच्या मनावर झाला. त्याच वेळेस त्या गरोदर होत्या. मुघलांच्या या अन्यायी जोखाडातून मुक्ती मिळवून स्वराज्य स्थापने साठी पुत्र मिळू दे अशी प्रर्थना त्यांनी शिवाई देवीच्या चरणी केली. कपट व अन्यायाचा राग हा गर्भ संस्कार घेऊनच स्वराजाचा निर्माता गर्भात मुठी आवळत होता. त्यातूनच स्वराज्य निर्मितीची प्रेरणा मिळाली अशी मांडणी राहुल भोसले यांनी केली. या घटनेच्या स्मृति जागृत करणे साठी व लखोजी राजे यांना अभिवादन करणे साठी देवगिरी किल्ल्यावर दर वर्षी कार्यक्रम करण्याची भूमिका त्यांनी मांडली व अहिल्यानगर च्या शिवप्रेमीनी मोठ्या संख्येने 25 जुलै ला देवगिरीला येणेचे आवाहन केले. तसेच देवगिरी या ठिकाणी लखोजी राजेंच्या स्मरणार्थ स्वराज्य प्रेरणास्तंभ उभारण्यात येईल अशी माहिती स्वराज्य तोरण प्रतिष्ठानचे कार्यवाह व भोसले घराण्याचे वंशज राहुलजी भोसले यांनी दिली.
इतिहासातील अशा घटनांचे विस्मरण होऊ नये.आपल्या छत्रपतींच्या स्वराज्याने काय काय किंमत मोजली याची जाणीव आजचे स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या पिढीला व्हावी म्हणून एक छोटासा प्रयत्न आपण करतो आहोत. देवगिरी गडावर २५ जुलै रोजी २०२४ रोजी स्वराज्य प्रेरणास्तंभाचे भूमिपूजन संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने यावे असे आवाहन संयोजन समितीचे सह संयोजक शंकर जाधव यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रा. भानुदास बेरड यांनी भुषवले व सूत्रसंचालन नितीन उदमले यांनी केले. संजय आडॊळे यांनी आभार मानले.