आषाढी एकादशीनिमित्त सर्व शासकीय कार्यालये,शाळांना सुट्टी : मात्र ऑक्झिलियम शाळेला सुट्टी नाही

संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय श्रद्धापूर्वक आषाढी एकादशी साजरी झाली. त्या निमित्ताने राज्यभर सर्व शासकीय कार्यालये व शाळांना सुट्टी होती. मात्र सावेडी अहिल्यानगर येथील ऑक्झिलियम शाळेमध्ये हि सुट्टी देण्यात आली नाही. या शाळेचे व्यवस्थापन ख्रिश्चन आहे. मात्र ८० ते ८५ टक्के विद्यार्थी हिंदू व इतर धर्मीय असून १५ ते २० टक्के विद्यार्थी ख्रिश्चन असल्याचे समजते. असे असताना शाळा सातत्याने एकाच धर्माशी सबंधित सण व उत्सव साजरे करते. कोणत्याही महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करत नाही. किंवा कोणत्याही महापुरुषांची चित्रे किंवा फोटो शाळेत लावले जात नाही. मात्र ख्रिश्चन संतांच्या संबंधित उत्सव साजरे केले जातात व त्यांचेच चित्रे किंवा फोटो लावतात अशा तक्रारी येत आहेत. छुप्या पद्धतीने ख्रिश्चन धर्माचा प्रचार हे व्यवस्थापन करत आहे का ? शालेय बालमनांवर, हिंदू संस्कृती पासून लांब जाण्याचे संस्कार केले जात आहेत का ? शालेय नियमांच्या नावाखाली धर्मांतराचा छुपा अजेंडा राबवला जात आहे का ? याची चौकशी करायलाच हवी. जे पालक याबाबत जाब विचारतील अथवा तक्रार करतील त्यांना अन्य मार्गाने जरब बसवण्याचे अनेक उदाहरणे समोर येत आहेत. शाळा शासनाच्या नियमानुसार चालत नसेल व स्वतःचा धार्मिक अजेंडा पुढे नेत असेल तर हि सर्व जबाबदारी शासनाची आहे. शिक्षणाधिकारी यांनी याबाबत काय कारवाई केली ते समजले पाहिजे. तरी या शाळेने आषाढी एकादशीची सुट्टी का दिली नाही? शाळेच्या दैनंदिन कामकाजात कोणत्या धार्मिक गोष्टी जसे प्रार्थना इ चा समावेश असतो? सदर शाळेचा परिपाठ शिक्षण विभागाच्या नियमानुसार आहे का ? शाळेत कोणते सण व उत्सव साजरे केले जातात? त्याला कोणी मान्यता दिली आहे? शासनाने शाळेची या बाबत सक्षम अधिकाऱ्यांमार्फत पंधरा दिवसात चौकशी करावी आणि चौकशी करताना पालकांना व हिंदुराष्ट्र सेनेला सहभागी करावे व शाळा अशा पद्धतीने हिंदू व अन्य धर्माबाबत द्वेषाचे काम करत असेल तर शाळेची मान्यता रद्द करणेबाबत कारवाई करावी. अन्यथा हिंदूराष्ट्र सेना व अन्य हिंदुत्ववादी संगठना आपल्या पद्धतीने शाळा व्यवस्थापनाला धडा शिकवतील त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी.
यावेळी,हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हा प्रमुख संजय आडोळे, शहर प्रमुख निखिल धंगेकर , गोशाळा महासंघाचे गौतम कराळे , जिल्हा उपप्रमुख राज शेलार,जिल्हा संयोजक अजिंक्य गुरावे, संघटनेचे सल्लागार ॲड. संतोष काकडे,तालुका संयोजक अविनाश सरोदे तालुका प्रमुख मनोज फुलारी ,उपनगर समन्वयक अमोल बारस्कर , शाखा प्रमुख समर्थ गोसावी ,आकाश कार्ले , विकास घोरपडे , सोनू साठे , अजय गाडे, आकाश शेळके , चांगदेव भालसिंग ,अजय शेळके,प्रसाद भागवत,पंकज नागपुरे, विठ्ठल बारस्कर , नंदकिशोर सरोदे व इतर पदाधिकारी आणि दलित महासंघांचे संजय चांदणे उपस्थित होते.