भारतीय संविधान व जिल्हा वाचनालयात असणारी त्याची मुख्य प्रत अभिमानास्पद – दिलीप पांढरे

 अहमदनगर – भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीयास अभिमानास्पद आहे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व घटना समिती सदस्यांनी प्रचंड मेहनत घेऊन आम्हा भारतीयास आमचे हक्क व कर्तव्य संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिले. या संविधानाच्या मुख्य प्रति पैकी एक प्रत अ. नगर जिल्हा वाटण्यात उपलब्ध आहे. हा अमूल्य ठेवा अ नगर मधील वाचकांसाठी व अहिल्यानगर जिल्हा वाचनालया साठी अभिमानास्पद असल्याचे उद्गार वाचनालयाचे उपाध्यक्ष दिलीप पांढरे यांनी काढले.
     संविधान दिन अमृत महोत्सवानिमित्त अ नगर जिल्हा वाचनालयात आयोजित संविधान शपथ ,चर्चासत्र  व ग्रंथ प्रदर्शन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संचालिका शिल्पा रसाळ संचालक, किराणा अग्रवाल, ग्रंथपाल अमोल इथापे, सहाय्यक ग्रंथपाल नितीन भारतात, रसिक वाचक अनिल झंवर,प्रभाकर सुरकुटला, किशोर उत्तरकर , पल्लवी कुक्कडवाल उपस्थित होते.
     यावेळी संविधाना त संविधानास 75 वर्ष झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते वाचनालयात उपलब्ध असलेल्या संविधान प्रतीचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा रसाळ तरआभार ग्रंथपाल अमोल इतापे यांनी मानले.
      कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ वर्षा जोशी, संकेत पाठक, संजय गाडेकर ,नितीन ढाकणे यांचे सहकार्य लाभले.