रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीच्या वाशिंग सेंटर विभागातर्फे महानगरपालिकेच्यादहा शाळांना मोफत सॅनीटायझर स्टँड वाटप

दहा शाळांना मोफत सॅनीटायझर स्टँड वाटप

नगर (प्रतिनिधी) – सध्याच्या बिकट परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच जन विविध उपाय योजना करून ,जागृती करून आपली जबाबदारी पार पाडत आहे.

अशा परिस्थितीत समाजिक भान जोपासणाऱ्या रोटरी प्रियदर्शिनीच्या वॉशिंग स्टेशन प्रकल्प प्रमुख डॉ. प्राची पाटील यांच्या सहकार्याने महानगरपालिकाच्या दहा शाळांना मोफत सॅनीटायझर स्टँड वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

रोटरी प्रियदर्शिनीच्या अध्यक्षा रो.गीता गिल्डा,व रो. दीपा चंदे यांच्या उपस्थित व रोटरी क्लब डिस्टीक गव्हर्नर हरिष मोटवानी यांच्याशी व्हिडीओ कॉल द्वारे संवाद साधून सॅनीटायझर स्टँड वाटप करण्यात आले.

येत्या काळात स्वच्छ: जोपासणे व प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे हि गरज बनणार असून मनपाच्या शाळांना भविष्यात लागणार्या गरजा ओळखून रोटरी प्रियदर्शिनीने हा उपक्रम सुरु केला असून शक्य तितक्या शाळांना मदत करण्यात येणार आहे.

यावेळी मनपा शाळा न. ४ रेल्वे स्टेशन श्री.विजय घिगे,मनपा गांधीनगर बोल्हेगाव चे श्री.अक्षय सातपुते,मनपा शाळा न.२३ आयोध्यानगर केडगावचे संदीप राजळे ,मनपा शाळा क्र.१६ भोसले आखाडा वर्षा दिवे,मनपा शाळा न.२ रिमांडहोमचे शशिकांत वाघुलकर आदी उपस्थित होते.

रोटरी वाशिंग सेंटर प्रकल्पांतर्गत मनपा शाळा न.२३ अयोध्यानगर येथे डॉ.प्राची पाटील,प्रतिमा मुथा,दीपा चंदे,सुरेखा मनियार,आरती लोहाडे यांच्या सौजन्याने व मुख्याध्यापिका लांडगे व शिक्षक राजळे यांच्या देखरेखीखाली अद्यावत असे वाशिंग सेंटर उभारण्यात आले आहे.

भिंगार येथील जानकीबाई कवडे प्राथमिक शाळेतील मुलींच्या सोयीसाठी आधुनिक टाँयलेट बांधून देण्यात आली आहेत

यासाठी प्रतिभा धूत,लता भगत,सुरेखा मनियार,नीना मोरे,कविता काणे,देविका रेळे यांचे योगदान लाभल्याची माहिती गीता गिल्डा यांनी यावेळी दिली.मुलींच्या उज्वल भविष्यासाठी रोटरी प्रियदर्शिनी राबवीत असलेल्या विविध उपक्रमांचे डिस्टीक गव्हर्नर हरिष मोटवानी यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या व ऑनलाईन शाळांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

सर्व शाळांच्या वतीने संदीप राजळे यांनी रोटरी प्रियदर्शनी क्लबचे पदाधिकारी, सदस्य, प्रायोजक यांचे आभार मानले.