ग्रामीण भागातील महिलांना फळ झाडांचे मोफत वाटप

आरोग्य व पर्यावरण संवर्धनासाठी सरसावल्या रोटरी प्रियदर्शिनीच्या महिला

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

निसर्गाची काळजी घ्या, निसर्ग तुमची दामदुपटीने काळजी घेईल व सर्व्ह टू चेंज लाईफ ही इंटरनॅशनल रोटरीची या वर्षातील दोन्ही थिम विचारात घेऊन रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीच्या महिला सदस्या आरोग्य व वृक्षरोपणासाठी कार्य करीत आहे. यासाठी फळझाडे लागवड आणि औषधी गुणधर्म असलेल्या शेवग्याच्या शेंगा झाड लावण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत ग्रामीण भागातील महिलांना फळ झाडे वितरीत करुन शेवग्याच्या शेंगाची रोपे लावण्यात आली.

 

 

 

 

 

शेवगाचे वृक्ष आरोग्यासाठी खुप चांगले असून, झाडांचे सर्व भाग म्हणजे शेवग्याच्या शेंगा, फुले, पाने हे अत्यंत पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेले आहे. त्याने रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. रोटरी प्रियदर्शिनी ग्रामीण भागातील महिलांना या वृक्षाच्या फायद्याविषयी माहिती देत असून, त्यांना रोपांचे विनामुल्य वाटपही करत आहे. जून 2022 पर्यंत क्लबच्या वतीने शेवग्याची 2022 झाडे वाटप करण्याचा संकल्प घेण्यात आला आहे.फ्रुट फॉरेस्ट प्रकल्पात रोटरी प्रियदर्शिनीने आंबा, चिकु, पेरु, चिंच सारखी फळझाडे ग्रामीण भागातील महिलांना भेट म्हणून दिली. फळ झाडाद्वारे शेतकरी कुटुंबाना आर्थिक फायदा होणार आहे. समाज शिक्षण संस्था राहुरी व भांडगाव (भाळवणी), डी. पॉल स्कूल वावरथ आणि समाज विकास समिती केंद्र नेवासा येथे ग्रामीण भागातील महिलांना 550 शेवग्याच्या शेंगा व फळ झाडांचे वितरण करण्यात आले. तसेच शेवग्याच्या शेंगा रोपांची लागवड देखील करण्यात आली.

 

 

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

या उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी क्लबच्या अध्यक्षा शशी झंवर म्हणाल्या की, निसर्गाचे समतोल बिघडल्याने दुष्काळ तर कधी महापूर सारख्या नैसर्गिक संकटे ओढवली जात आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षरोपण हा एकमेव पर्याय असून, या मोहिमेत रोटरी  प्रियदर्शिनीच्या महिला योगदान देणार असल्याचे सांगितले. देविका रेळे यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर मोठ्या प्रमाणात फळ झाडांची लागवड झाल्यास गावे हिरवाईने नटणार आहे. तर पर्यावरणाचे संवर्धन होणार असून, फळ झाडांमुळे शेतकर्‍यांना उत्पन्न देखील मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. माधुरी झंवर यांनी शेतकर्‍यांना जोडधंदा म्हणून फळझाडे चांगला पर्याय आहे. यामुळे आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे. बांधावर लावलेल्या झाडामुळे माती वाहून न जाता, त्याचा फायदा शेतीसाठी होणार असल्याचे सांगितले. क्लब ट्रेनर डॉ. बिंदू शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते.