सातपुड्यात साडेसहाशे रुपयांच्या बियांमधून चार लाखांच्या गांजांचे उत्पादन

20 ते 25 हजार रुपये किलो ने विक्री

धुळे जिल्ह्यात शिरपूर तर जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात सातपुडा पर्वतरांगा आहे. तिथे वनविभागाच्या जमिनीवर त्याच भागातील काही शेतकरी लपवून गांजाची शेती करतात. एक एकरात गांजा 600 रुपयांचे 400 g बियाणे लागते. त्यापासून त्यांना साधारण २० किलो गांजांचे उत्पादन मिळते. सरासरी 20 ते 25 हजार रुपये किलो ने विकला जातो. म्हणजे किमान चार लाख रुपये ते मिळवतात. त्यांची दहशत इतके आहे की, पोलीसही तिथे छापा टाकायला कचरतात. शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडे, खांदरागड परिसर, भोईटी सेन, उमरटी, वैजापूर मध्य प्रदेशातल्या बालवाडी, गेरुघाटी, पार उमरटी ही गांजा पिकवण्याचे हॉटस्पॉट असलेली ठिकाण आहेत. या भागात लाकड्या हनुमान, रोहिणी, महादेव, दोंदवाडे या गावांमध्ये तर डोंगर आणि पर्वतरांगांच्या सपाट जागांवर जवळचे शेतकरी शेती करत असतात. पिकांमध्ये लपवून गांजा पेरला जातो. एक तर ही जागा अशी असते की सामान्य माणूस तिकडे सहजासहजी फिरकत नाही. फिरकलास तर जोपर्यंत गांजाला फुले लागत नाही तोपर्यंत त्यांचा वास येत नाही. त्यामुळे आत गांजा लागवड केली आहे, हे कोणाला कळत नाही. जेव्हा फुले लागतात तेव्हा पोलिसांच्या खबऱ्यांना त्यांचा वास लागतो आणि ती माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली जाते. जास्त प्रमाणात पीक लागवड असेल तरच कधीतरी पोलीस कारवाईचा धोका पत्करतात. अन्यथा अर्थपूर्ण दुर्लक्ष हाच मार्ग पोलीसही स्वीकारतात. कारण इतक्या दुर्गम भागात कारवाई करणे जीवावरच्या जोखमीपेक्षा कमी नाही. असा अनुभव पोलिसांनी घेतलेला आहे. चार ते सात फूट उंचीपर्यंत गांजाचे झाडे वाढतात. ते जमीन आणि पाण्यांवर अवलंबून असतात. त्यामुळे अनेक झाड उंच ठिकाण ठिकाणी आणि डोंगरावरही ठिबकन पाणी देण्याची व्यवस्था केली केलेली असते. मे महिन्यात किंवा त्यानंतर गांज्यांची लागवड केली जाते. त्याचं बी धन्याच्या आकाराचं असतं ते पूर्वी मध्य प्रदेशातून विकत आणलं जायचं. पण आता शेतकरी गांजाच्या फुलातूनच हे बी काढून ठेवतात. ते हजार ते पंधराशे रुपये किलो दराने विकत मिळतं. एक एकर शेतात गांजा लावण्यासाठी 400 ग्रॅम बी लागत. त्यापासून पीक चांगलं आलं, तर आले तर साधारण २० किलो गांजा मिळतो. गांजाचा दर्प आणि कोरडेपणा यावर त्याची किंमत ठरते साधारणतः 20 ते 25 हजार रुपये किलो प्रमाणे गांजा विकला जातो.