पूरग्रस्तांसाठी शिवसेनकडून मदत.

३ हजार कुटुंबियांसाठी ५ ट्रक रवाना

अहमदनगर (वैष्णवी घोडके)
                                 ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या उक्तीप्रमाणे शिवसेना कायमच सामाजिक कामात मदतीसाठी तत्पर असते. महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून नैसर्गिक संकटाशी दोन हात करतोय.  अतिवृष्टीमुळे दक्षिण महाराष्ट्र तसेच कोकण भागात पूर परिस्थिती निर्माण झालीय.

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

                                पूरग्रस्तांना  मदत म्हणून फूल ना फुलाची पाकळी म्हणून ,अहमदनगर नगर शहर शिवसेनेच्या वतीने  पूरग्रस्तांना पाण्याची बॉटल व जीवनावश्यक खाद्यपदार्थ व कपडे अशा स्वरूपाची मदत शहर शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांना करण्यात आली.  यावेळी शहर शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते,  महापौर रोहिणीताई शेंडगे,  युवासेनेचे विक्रम राठोड,  माजी शहरप्रमुख संभाजी कदम,  नगरसेवक बाळासाहेब बोराटे,  नगरसेवक परेश लोखंडे,  दत्ता जाधव,  मदन आढाव,  संजय शेंडगे,  माजी महापौर अभिषेक कळमकर,  संतोष ग्यानप्पा , शिक्षक सेनेचे अंबादास शिंदे, मंगेश शिंदे,  गिरीश हंडे,   महिला आघाडीच्या अरुणाताई गोयल,  आशाताई निंबाळकर, आणि शिवसैनिक उपस्थित होते.