शोबाजी करायची असेल तर कोकणात मदत करा

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबईच्या बाहेर येत नाहीत. माञ हिरोगिरी दाखविण्यासाठी पंढरपूरला गाडी चालवत जातात. शोबाजी करायची असेल तर कोकणात मृत पावलेल्या लोकांच्या कुटूंबियांना मदत करा.अशी टिका भाजपाचे प्रभारी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केलीय. ते राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवारा येथे युवा कार्यकर्ते आढावा बैठकीत बोलत होते.

 

 

 

याप्रसंगी भाजपाचे युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी आघाडी सरकारवर टिका करत अन्यायाच्या विरोधात युवकांनी एकञ येत रस्तावर उतरून संघर्ष करावा असे आवाहन केल. भाजपाचे प्रभारी प्रदेश अध्यक्ष  तर नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी देखील आपलं मनोगत यावेळी व्यक्त केले.शनिवार दि.२४ जुलै रोजी देवळाली प्रवरा येथे भाजपाचे प्रभारी प्रदेश अध्यक्ष, युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा कार्यकर्ते अढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रसंगी काही युवा पदाधिकारीच्या निवडी करण्यात आल्या.

 

 

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा.

 

 

 

भाजपाचे प्रभारी प्रदेश अध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार चंद्रशेखर कदम हे होते. तर यावेळी संकेत बावनकुळे, आण्णासाहेब चोथे, मुरलीधर कदम, बाळासाहेब खुरुद, ज्ञानेश्वर वाणी, भारत शेटे, सागर खांदे, राजेंद्र ढुस, सोपानराव शेटे, अनुप मोरे, माऊली कारले, सुधीर टिक्कल, अजित चव्हाण, दिलीप मुसमाडे, भाऊसाहेब गडाख, भिमराज मुसमाडे, सचिन सरोदे, अजित चव्हाण, शहाजी कदम, वसंत कदम आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी केले तर शेवटी सचिन ढुस यांनी आभार मानले.