जेष्ठ नागरीक मंच व सनएज केअर कंपनी यांच्या वतीने दि.23 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

 नगर- जेष्ठ नागरीक मंच, सावेडी व सनएज केअर कंपनी, सातारा, शाखा अहिल्यानगर यांच्या वतीने सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3 ते सांय.6 वाजेपर्यंत  जेष्ठ नागरीक सभागृह, गुरुकृपा कॉलनी, जैन स्थानक जवळ, सावेडी, अहिल्यानगर येथे आयोजित केले आहे.

     या शिबीरात गुडघे दूखी, कंबर दूखी, रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल, अ‍ॅसिडीटी इत्यादी तपासणी एकाच अत्याधुनिक मशीनव्दारे तज्ञांकडून केली जाणार आहे. तरी सर्व जेष्ठ नागरीकांनव इतर नागरीकांनी त्याचा लाभ घ्यावा.

     या शिबीरास सनएज कंपनीचे प्रतिनिधी ओमकार फरताडे, यास्मीन पठाण, रविंद्र घोडके  हे उपस्थित राहणार आहेत. या शिबीरात आजारांवर योग्य दरात औषध उपलब्ध होतील. तरी या शिबीराचा नागरीकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जेष्ठ नागरीक मंच व सनएज केअर कंपनीच्या वतीने करण्यात आली.