जगासमोरसील सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मूलभूत विज्ञान महत्वाचे
नोबेल पुसुस्कारांविषयी के जे सोमैय्या येथे सुक्षमजीव शास्त्र विभाग मध्ये प्रा कुकरेजा गिरीश ह्यांचे व्याख्यान
एज्युकेशन सोसायटीचे के.जे.सोमैया कॉलेज ऑफ आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स मोहिनीराज नगर कोपरगाव,या महाविद्यालयात डी. बी. टी. स्टार योजने अंतर्गत अहमदनगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, या महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख मा. प्रो.जी.पी.कुकरेजा यांच्या उपस्थितीत विशेष व्याख्यानाचे आयोजन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ . विजय ठाणगे, डी. बी. टी. स्टार समन्वयक प्रा.डाॅ. एस. जी. कोंडा ,सुक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा.एम.एस.वंजारे आणि सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे सर्व प्राध्यापक इत्यादी व या कार्यक्रमासाठी विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा.एम.एस.वंजारे यांनी केले. प्रो.जी.पी.कुकरेजा यांनी औषधे आणि शरीर विज्ञान याअंतर्गत नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञांविषयी तसेच हिपॅटायटीस सी विषाणू बद्दल माहिती सांगितली.प्रा कुकरेजा ह्यांनी नोबेल पुरस्काराची सुरुवात कशी झाली व १९०१ पासून दिल्या जाणाऱ्या फिसिओलॉजि अँड मेडिसिन ह्या कॅटेगरी मधील आता पर्यंत देण्यात आलेल्या पुरस्कारांचं आढाव घेत, शास्त्राद्यांनी ते शोध कशे लावले व संशोधनाच्या वाटा कश्या बदलत गेल्या , व विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवन कस सुखकर व आनंदी होत गेला ह्याच सविस्तर विवरण त्यांच्या व्याख्यानात त्यांनी केल . सर सी वि रमण , भारतातील प्रथम नोबेल पारितोषिक विजेते , ह्यांचा प्रवासावर विशेष प्रकाश त्यांनी टाकला व मुलांनी अश्या शास्त्रद्यांकडून प्रोत्साहन व प्रेरणा घायवी असे आव्हान केले प्रा कुकरेजा ह्यांनी त्यांच्या विनोदी व विशेष शैलीने सर्व श्रोत्यांना मंत्रमुघ्दा करत त्यांना संशोधण्याचा नवीन दिशा उलघडून दिल्या. यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी प्रा.जी.पी.कुकरेजा सर करत असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.निशा अहिरे यांनी केले तर प्रा. वैष्णवी कडिऀले यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव संजीवजी कुलकर्णी, ट्रस्टी संदीपजी रोहमारे व संस्थेचे पदाधिकारी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.