अधिकमास व पितृपक्षामुळे लांबणीवर पडलेले विवाह सोहळे तुळशी विवाहपासून पुन्हा सुरू झाले आहेत. २७, २८आणि २९ नोव्हेंबर च्या शुभमुहूर्तावर शहरातील ४६ विविध मंगल कार्यालय आणि लॉन्स मध्ये 216 विवाह सोहळे पार पडले. डिसेंबरमध्ये विवाहचे १०तर जानेवारी, फेब्रुवारी २०२४ मध्ये २५ मुहूर्त आहे. विवाह सोहळ्यांचे मुहूर्त सुरू झाल्याने कापड बाजारात वधुरांचा बसता आणि सराफ बाजारात दागिने खरेदीसाठी गर्दी सुरू झाली आहे. विवाह सोहळ्यांचा इव्हेंट करण्यावर ७५% वधूवरांसह कुटुंबीयांचा भर आहे. यात पोर्ट फायर, डेकोरेशन, प्रवेशद्वार आणि एन्ट्री ला प्राधान्य दिले जाते दिले जाते. विवाह सोहळ्यात जेवणाचा ट्रेंडही बदलला असून वेगवेगळ्या देशातील आणि वेगवेगळ्या राज्यातील पदार्थांना पसंती दिली जात आहे. चायनीज, कॉन्टिनेन्टल, इटालियन फूड पंजाबी डीश, विविध चाटला सर्वाधिक मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे शहरासह जिल्ह्यात यंदा ८ महिन्यांच्या मुहूर्तावर १४,७८५ विवाहांचा बार उडणार आहे. जुलै ते ऑगस्ट दरम्यान अधिक मास आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत असलेल्या पितृपक्षामुळे विवाह सोहळे थांबले होते. नोव्हेंबर मध्ये दिवाळीचा काळ असल्याने या कालावधीत विवाह सोहळे झाले नाहीत. 27 नोव्हेंबरला तुळशी विवाहाच्या दिवसापासून पुन्हा विवाह सोहळ्यांना सुरुवात झाली आहे.
Prev Post