सरकारी कर्मचारी 14 डिसेंबर पासून संपावर

जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

मागील संपाच्या वेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सहा महिने उलटूनही केलेली नसल्याने राज्यातील सरकारी निम सरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपाची हाक दिली आहे. त्यानुसार 14 डिसेंबर पासून बेमुदत संपाची नोटीस महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, अहमदनगर शाखा व सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य सरकारला देण्यात आले. त्यावेळी समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे, ग्रामसेवक संघटनेचे एकनाथ ढाकणे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे आप्पासाहेब शिंदे, विजय काकडे, पी.डी कोळपकर पुरुषोत्तम आडेप आदी उपस्थित होते. मार्च 2023 मध्ये सरकारी कर्मचारी, शिक्षकांनी जुनी पेन्शन व इतर 17 मागण्यांबाबत बेमुदत संप पुकारले होते. हे संप स्थगित करताना मुख्यमंत्री यांनी राज्य सरकारच्या वतीने संघटनेच्या शिष्ट मंडळाची चर्चा करून लेखी आश्वासन दिले होते.