” चला करूया गाण्याच्या गप्पा गोष्टी”…

नगर मध्ये प्रथमच स्वरांकित फाऊंडेशनच्या वतीने दोन दिवसीय भावसंगीत कार्यशाळा

अहमदनगर  (संस्कृती रासने)

चला करूया गाण्यांच्या गप्पा गोष्टी या हेतूने सुप्रसिद्ध गायकडॉ.सलील कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याची  संधी  स्वरांकित फाऊंडेशनच्या वतीने  नगरच्या संगीत व कला प्रेमींसाठी उपलब्ध होत आहे.येत्या २५ सप्टेंबर शनिवार दुपारी ४ ते ७  व २६ सप्टेंबर रविवार सकाळी ११ ते २ या वेळेत दोन दिवसीय भावसंगीत कार्यशाळा हॉटेल साईइन येथे आयोजित करण्यात आली आहे.

 

 

या कार्यशाळेत नवीन गाणे शिकताना तयारी कशी करावी, काय करावे.कविता,वृतांचा अभ्यास , नवीन रचना , आवाज व शब्दोचार , लय म्हणजे काय.गाण्यातील विरामचिन्हे व त्याचा परिणाम .मायक्रोफोनचे तंत्र ,आवाज चढउतार .भावसंगीताची गरज ब या विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

 

 

संगीत, गाणे याची आवड सर्वांनाच असते.भावसंगीतातून मिळणारा आनंद व मानसिक समाधान व तेही सुप्रसिद्ध गायक व संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी यांच्या समवेत अनुभवण्यासाठी  हि कार्यशाळा आयोजित केल्याचे स्वरांकित फाऊंडेशनचे  ऋषिकेश कुलट यांनी सांगितले. आधिक  माहितीसाठी व सहभागी होण्यासाठी ९९२२८०९०९० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.