मुंबई :
भारतातील सर्वात मोठे उद्योजक असलेल्या अंबानींच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी आजोबा आणि पत्नी नीता अंबानी आजी झाल्या आहेत. त्यांची सून श्वोकाने गुरुवारी सकाळी 11 वाजता एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यामुळे अंबानी कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. एकीकडे कोरोना काळात मुकेश अंबानी यांनी जियो प्लॅटफॉर्म्सवर बक्कळ पैसा कमावला. दुसरीकडे, त्यांच्या नातवाचा जम्न झाला, त्यामुळे मुकेश अंबानींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.