व्यापारी आणि माथाडी कामगारांची उद्या भारत बंदची हाक 

 
  मुंबई : 
 
माथाडी कामगार व व्यापा-यांनी उद्या ८ डिसेंबर ला  केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन कायद्याविरोधात संप पुकारला आहे.  राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील सर्व कामगार या संपात  सहभागी असणार आहेत.  उद्या भारत बंदमध्ये मुंबई, नवी मुंबई, तुर्भे इथल्या 5 बाजार समित्या बंद असणार असून पुणे, नाशिक एपीएमसी, यवतमाळ जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 
 
शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपात व्यापारी आणि माथाडी कामगार सहभागी होणार असा संबंधित बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.   केंद्र सरकारने कृषी व पणन कायद्यात केलेल्या बदलामुळे व नवीन कायद्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील व्यापाऱ्यांचा व्यवसाय आणि कष्टाची कामे करणाऱ्या माथाडी कामगारांची कामं कमी झाल्यामुळे या घटकांवर आणि शेतकऱ्यांवर बेकारीचं संकट ओढवलं आहे.   
यामुळे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप आणि व्यापारी असोसिएशनने पदाधिकारी व बाजारसमीतिचे संचालक यांनी संपाचा निर्णय घेतला आहे.

 

या बैठकीत माथाडी नेते नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व बाजार समितीच्या संचालक उपस्थित होते.