विद्यार्थी घडवण्याची जेवढी शिक्षकांची जबाबदारी तेवढीच पालकांची असते- डॉ.निळकंठ ठाकरे

श्री.नाथ विद्या मंदिरचे स्नेहसंमेलन संपन्न

नगर- आपल्या पाल्यांची तुलना इतर विद्यार्थ्यांशी न करता आपल्या पाल्याने साधलेल्या यशाचे कौतुक पालकांनी करावे. विद्यार्थ्यांनी देखील चुकीला कधीच घाबरू नये कारण चुकीमुळेच नवीन ज्ञान आत्मसात करायला संधी मिळते. शालेय शिक्षणाबरोबरच  सामाजिक शिक्षण महत्त्वाचे असते. स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. संस्कृतीची जपणूक होते. चांगले विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी जेवढी एका शिक्षकाची असते तेवढीच पालकाचीही असते, असे प्रतिपादन डॉ. गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.निळकंठ ठाकरे यांनी केले.
       वसंत टेकडी येथील श्री.नाथ विद्या मंदिरचे स्नेहसंमेलनात प्रमुख अतिथी डॉ.निळकंठ ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी संस्थेचे सहसचिव रामकिसन देशमुख, खजिनदार प्रा. दादासाहेब भोईटे, संकुलच्या प्रमुख डॉ. रेखाराणी खुराणा, प्राचार्य भरत बिडवे, संदीप कांबळे, डॉ.सुचित्रा डावरे, सविता सानप, डॉ. श्याम पंगा, मुख्याध्यापिका सौ.अनिता सिद्दम, सौ.अंजली शिरसाठ, सौ.मीरा नराल मान्यवर उपस्थित होते.
       डॉ. ठाकरे म्हणाले फळाची अपेक्षा न करता विद्यार्थ्यांनी कार्यरत राहावे. आसक्ती नको एकाग्रता असेल तर फळ लवकर मिळते पालकांनी संस्कार करताना विद्यार्थ्यांचे दोष दाखवून देत जावे याचा उदाहरणासह दाखला देत ते म्हणाले लहान मुलं जमिनीवर पडले की आपण जमिनीला मारतो व त्याने तुला पाडले असे सहज म्हणतो पण ते मुलांच्या लक्षात रहाते. त्यामुळे त्यांचे स्वतःतील दोष लपवले जातात असे होता कामा नये असे डॉ.ठाकरे यांनी सांगितले.
      अध्यक्षीय भाषणात रामकिसन देशमुख यांनी पालक व विद्यार्थी यांनी विज्ञान शाप की वरदान याबाबत जागरूकपणे रहावे. संस्थेचे ध्येयधोरण हे फक्त या शाळेतून चांगले विद्यार्थी घडवून जबाबदार नागरिक कसे होतील यावर भर देत असते. सध्या पावलोपावली संघर्ष आहे. संघर्षातून सुरुवात करण्यासाठी समोर कोणाचा तरी आदर्श ठेवावा आमच्या शाळेतून खो-खो स्पर्धेतून गायन स्पर्धेतून विद्यार्थी जागतिक पातळीवर नाव चमकविले शाळेचे नाव उंचावले ही अभिमानाची बाब आहे असे श्री. देशमुख म्हणाले.
      प्रास्ताविकात मुख्याध्यापिका सौ. अनिता सिद्दम यांनी शाळेतील यशामध्ये केलेल्या कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या स्पर्धेतील विविध बक्षिसे, उपक्रमांत सहभागी होऊन यश संपादन केले.त्याचा अहवाल सादर केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वर्षा कबाडी यांनी केले तर सौ.मिनाक्षी यन्नम यांनी आभार मानले.
——–