निळवंडे धरण भरल्यानंतर जायकवाडीला पाणी

भंडारदरा धरणातून 1928 दलघनफू विसर्ग, निळवंडेचा साठा 55%

नगर : भंडारदरा धरणाचा जलसाठा ९२ टक्क्यांवर पोहोचल्यानंतर प्रवरापात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे गुरुवारी दुपारनंतर धरणातून 10928 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. निळवंडेचा जलसाठा 55.32 टक्क्यांवर पोहोचला असून हे धरण भरल्यानंतरच जायकवाडीच्या दिशेने पाणी झेपावणार आहे. भंडारदरा धरणाची क्षमता अकरा हजार 039 दशलक्ष घनफू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदाच्या मानसूनमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे धरणात 1 जून ते 1 ऑगस्ट या एका महिन्याच्या कालावधीत 9735 दशलक्ष घनफू नवीन पाण्याची आवक झाली. बुधवारपासून धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. गुरुवारी सकाळी सहा वाजता हा विसर्ग १७३४ क्युसेक होता. दुपारी तीन नंतर त्यात वाढ करून १९२८ करण्यात आला. भंडारदरातून पाणी झेपावल्यानंतर निळवंडे धरणात पोहोचणार आहे. हे धरण भरल्यानंतर जायकवाडीला पाणी पोहोचेल. सद्य स्थितीत जायकवाडीचा जलसाठा अत्यल्प आहे 15 ऑगस्टपर्यंत जायकवाडीत समाधानकारक जलसाठा झाला नाही, तर नगर नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्याची मागणी होऊ शकते. मुळा धरणाचा जलसाठा 64.69 टक्क्यांवर पोहोचला असून सद्यस्थितीत हा जलसाठा 16820 दशलक्ष घनफूट इतका आहे.