बिबट्याच्या हल्ल्यात संगमनेरमधील एका दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू
राहुरी लोणी परिसरात लहान मुलांनाच केले भक्ष
संगमनेर : जिल्ह्यातील मानवी वस्तींमध्ये घुसून लहान मुले व नागरिकांवर बिबट्याचे हल्ले सातत्याने वाढत झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील हिरवळगाव पावसा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ओवी सचिन गडाख गडाख या तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजता घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, गेल्या सात महिन्यात बिबट्याने पाच जणांचा जीव घेतला, तर गेल्या वर्षभरात 42 जणांना जखमी केले आहे. 2829 पशुधनाला बिबट्याने भक्ष केले आहे. ओवीचे वडील सचिन गडाख हे शेतकरी आहे. ओवीची आई घराशेजारीच गिनी गवत काढत होत्या. यावेळी ओवी तीच्या सोबतखाली बसलेली असताना, दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. ओवीच्या आईने मोठ्याने हंबरडा फोडला. त्यामुळे आजूबाजूचे लोक गोळा झाले. बिबट्या मुलीला घेऊन बराच पुढे गेला होता. गावातील एका शेतकऱ्याने ट्रॅक्टर गवतामध्ये घातला. आणि बिबट्या मुलीला सोडून पळून गेला. अशी माहिती येथील डॉ. प्रमोद पावसे यांनी दिली. गंभीर जखमी मुलीला मेडिकव्हर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तीचा दुर्दैवी अंत झाला. बिबट्या पाच-सहा दिवसांपासून या परिसरात अनेकांना दिसला होता. या दुर्दैवी घटनेने हिवरगाव पावस परिसरात संतापाचे व दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाचे अधिकारी कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या परिसरातील वीटभट्टी जवळ असणाऱ्या गोठ्यातून बिबट्याने एक शेळी फस्त केली होती. त्यामुळे परिसरात आता एकच घबराट निर्माण झाली आहे.