संगमनेर : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे 4.5 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद सकाळी सव्वा सात वाजता झाली. त्याचबरोबर संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले अचानक जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घारगाव परिसरात बुधवारी सकाळी सव्वा सात ते सात वाजून 18 मिनिटांच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के बसले एका जागेवर बसलेल्या काही जणांना हे धक्के दोन वेळा जाणवले. पूर्व-पश्चिम धक्का बसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. या भूकंपात घरातील कपाटे, भांड्यांचा आवाज झाल्याचे हे ग्रामस्थांनी सांगितले. घारगाव परिसरात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता अत्यंत कमी होती. या घडामोडींच्या नोंदी नाशिक येथील भूकंपमापक यंत्रावर झाल्या नसल्याचे मेरी संस्थेच्या भू वैज्ञानिक चौधरी यांनी सांगितले. यापूर्वीही अनेक वेळा बोटा तसेच घारगाव येथे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले होते. याबाबत नाशिक येथील भूकंपमापक यंत्रावर नोंदी मात्र झालेल्या आहेत.