छिंदम विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची गृह विभागाची परवानगी

पोलीस निरीक्षकांनी दिली माहिती

अहमदनगर:

भाजपाचा तत्कालीन उपमहापौर, शिवद्रोही श्रीपाद छिंदम याने शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी त्याच्या विरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी राज्याच्या गृहविभागाने दिली आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी या संदर्भातील आदेश आम्हाला आजच प्राप्त झाला असून आम्ही लवकरच न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करणार असल्याचे सांगितले.

 

हे ही पहा आणि  चॅनेल सबस्क्राईब करा  

 

 

 

 

 

2018 साली श्रीपाद छिंदम याने महानगरपालिकेतील कर्मचारी बिडवे याला फोन करून शिवीगाळ केली व तसेच शिवरायांबद्दल अपशब्द वापरले होते. याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्याचे तीव्र पडसाद जिल्ह्यासह राज्यामध्ये उमटले होते. 9 फेब्रुवारी 2018 रोजी ही घटना घडल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रितपणे येऊन छिंदमवर गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करा अशी मागणी केली होती.

 

 

सदर घटना घडल्यापासून श्रीपाद छिंदम फरार झालेला होता. अखेर पोलिसांनी नगर-सोलापूर महामार्गावर असलेल्या एका गावातून मोठ्या शिताफीने याला अटक केली होती. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनाने राज्य शासनाकडे या संदर्भामध्ये पुढील काय कारवाई करावी व कशा पद्धतीने जावे यासंदर्भात मार्गदर्शन मागवले होते. अखेर आज राज्याच्या गृह विभागाने छिंदमच्या विरोधामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी परवानगी दिली आहे.