शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर 25 जुलैला जन आंदोलन

निवासी शहर शासनाने विमा कंपन्यांची घरे भरण्यासाठीच पिकविमा योजना सुरू केली होती. असा आरोप करत अधिकारी आणि विमा कंपनीचे संगनमताने कोट्यावधी रुपयांचे गैरप्रकार करत आहेत. शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला पाहिजे. शासकीय विमा कंपनीकडे पिक विमाचे काम द्यावे, उसाच्या एफआरपी प्रमाणे दुधाचा एमएफसी दूध भेसळ प्रतिबंधक कायदा करावा या मागण्यांसाठी 25 जुलैपासून जन आंदोलन करणार असल्याचे शेतकरी संघटना राज्य उपाध्यक्ष ऍड. अजित काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकरणी शेतकरी संघटनेने विमा कंपन्यांवर व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी केली. परंतु या मागणीवर प्रशासनाकडून अद्याप कोणताही कोणतीही हालचाल दिसत नाही. तीन जिल्ह्यांच्या शेतकरी संघटनेने याचिका दाखल केली असून, नगर जिल्ह्याची सुद्धा लवकरच याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले.