दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये कै. रेखे सर व कै.विश्वास कुलकर्णी स्मृतीदिन साजरा
दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये कै. रेखे सर व कै.विश्वास कुलकर्णी स्मृतीदिन साजरा.
नगर- प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या कै. वि. ल. कुलकर्णी प्राथमिक शाळेमध्ये संस्थेचे संस्थापक कै.चंद्रकांत हरी रेखे व शाळेला ज्यांचे नाव आहे ते कै. विश्वास लक्ष्मण कुलकर्णी यांचे स्मृतीदिन शाळेच्या प्रांगणात संपन्न झाले. या प्रसंगी संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
शाळा स्थापनेचे व्रत घेऊन ध्येयपूर्तीसाठी केलेला रेखे गुरुजींचा खडतर प्रवास, त्यांची शिस्त त्यांचा ज्ञानाचा व्यासंग, विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम या विषयींची कृतज्ञता सर्वांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.तसेच बुद्धिमत्ता, जिद्द, चिकाटी या गुणांचे धनी असलेले कुटुंबासोबतच समाज ऋणाचे भान असणार्या विश्वास कुलकर्णी यांच्या स्मृतींना उजाळा देवून दोघांच्याही कार्याला अभिवादन केले.
रेखे गुरुजी व विश्वास कुलकर्णी यांचेकडून त्यांचे गुण अंगिकारून, प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नरत असावे अशी आशा मान्यवरांनी व्यक्त केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते सादर केली.
कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. धरम ज्येष्ठ शिक्षिका सौ. खडके सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सौ. भारदे व सौ. पवार यांनी सुत्रसंचालन केले तर सौ.बंड यांनी आभार व्यक्त केले.