पुण्यात बॅडमिंटन या खेळाचे भविष्यवेधी प्रयोग–खेळडूंचा चांगला प्रतिसाद

पुण्यात बॅडमिंटन या खेळाचे भविष्यवेधी प्रयोग--खेळडूंचा चांगला प्रतिसाद

पुण्यात बॅडमिंटन या खेळाचे भविष्यवेधी प्रयोग–खेळडूंचा चांगला प्रतिसाद
अश्या स्पर्धात्मक बदलातून आकर्षकता व खेळातील रंगत वाढून बॅडमिंटन खेळ अजून बहरेल —दत्तात्रय दराडे (ए.टी एस हेड -पुणे)
सर्वच खेळामधील खेळाडूंची,प्रेक्षकांची अधिक रुची वाढावी यासाठी जागतिक पातळीवर नियमावलीत बदल करून त्यातील आकर्षकता वाढवून त्या-त्या खेळाचा अधिक प्रसार व्हावा.यासाठी प्रयत्न होताना दिसतात.असाच बदल बॅडमिंटन या खेळात करण्याचा प्रयत्न होत असून अश्या स्पर्धात्मक बदलातून बॅडमिंटन खेळ निश्चितच अजून बहरेल -उदाहरणार्थ क्रिकेटमध्ये आता टेस्ट व्यतिरिक्त टी-२०,आय पी एल या सारख्या कमी वेळेच्या व खेळाडूंना व प्रेक्षकांना देखील अधिक आनंद देणाऱ्या अश्या स्पर्धांचे आयोजन होत असल्याचे आपण पाह्तो व प्रेक्षकांनी देखील असल्या आयोजनास पसंती देखील दिली आहे असे उद्गार पुण्याचे श्री .दत्तात्रय दराडे (ए.टी एस हेड -पुणे)यांनी काढले बॅडमिंटन खेळाच्या भविष्यातील विकासासाठीचा एक स्पर्धात्मक बदल म्हणून पुण्यातील फिटनेस तज्ज्ञ मिहीर तेरणीकर आणि प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आर्य भिवपाठकी ,यश शाह यांच्या पुढाकाराने बॅडमिंटन खेळामध्ये त्रिपल्स (३ वि ३) आणि ५ वि ५ अशा दोन नाविन्यपूर्ण प्रकारातील स्पर्धांचे आयोजन नुकतेच शिवाजीनगर येथील मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले याप्रसंगी श्री दत्तात्रय दराडे बोलत होते होते. पुण्यात उगम झालेल्या बॅडमिंटन या खेळात विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण स्पर्धात्मक बदल आणून तो खेळ आधिक आकर्षक व वैश्विक पातळीवर प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येत असल्याचे स्पर्धेच्या आयोजकांनीया या प्रसंगी सांगितले
बॅडमिंटनच्या या स्पर्धेत विविध गटातील खेळाडूंची सर्वसमावेशकता हे या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे खरे सौंदर्य असल्याचे व त्यामध्ये नाविन्यपूर्ण बदल व्हावेत व खेळाडूंमध्ये या बदलाचे आकर्षण वाढावे हे उद्दिष्ट होते पुण्यातील सर्व बॅडमिंटनप्रेमींना एकत्र आणून या खेळाचा आनंद नव्या, गतिमान, आकर्षक, रोमांचक पद्धतीने देण्यात यावा व त्यासाठी एक स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध व्हावे हा होता अशी माहिती आंतरराष्ट्रीय कोच मिहीर तेरणीकर बॅडमिंटन खेळाडू आर्य भिवपाठकी,व यश शाह यांनी दिली .बॅडमिंटन हा खेळ वलयांकित आणि व्यावसायिक खेळ म्हणून आज जागतिक पातळीवर सुप्रसिद्ध असलेल्या बॅडमिंटन या खेळाची सुरुवातहि पुण्यात झाली तसेच आता याच पुण्यात बॅडमिंटन या खेळाच्या स्पर्धेत अनेक नाविन्यपूर्ण आकर्षक बदल करण्याचा प्रयत्न होत आहे. हा प्रयत्न विविध वयोगटातील बॅडमिंटन पटूंच्या पसंतीस उतरत असून याचे स्पर्धात्मक आयोजन स्विकारायला देखील ते तयार असल्याचे पहायला मिळाले आहे
पीडीएमबीएच्या कोर्टवर संपन्न झालेल्या या स्पर्धेमध्ये निवडक एकूण ५० बॅडमिंटन पटूंनी आपला सहभाग नोंदविला स्पर्धा पुणे डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असो.च्या मान्यतेने योनेक्स -सनराईज इंनोवेशन विंग अ बॅडमिंटन व तेहरणिकर्स फौंडेशन व रेटिकुलो स्पोर्टस टेकनॉलॉजि यांच्या वतीने प्रथमच आयोजन करण्यात आले होते.
याविषयी अधिक माहिती देताना स्पर्धेचे आयोजक मिहीर तेरणीकर म्हणाले, “रॅकेट इव्हेंट्समध्ये प्रामुख्याने एकेरी आणि दुहेरी असे दोनच प्रकार आपल्याला पहायला मिळतात.या खेळाचा आनंद आणखी द्विगुणीत व्हावा, खेळाचे व खेळाडूंचे,प्रेक्षकांचे देखील स्पर्धेतील आकर्षण वाढावे व यासोबतच नियमांची मर्यादा काटेकोरपणे पाळली जाऊन खेळाडूंची क्षमता वाढावी, प्रेक्षकांनाही आकर्षक अनुभव मिळावा या दृष्टीने बॅडमिंटन या खेळात काही प्रकारचे बदल करावेत असा विचार आम्ही केला आणि त्यानुसार मॉडर्न त्रिपल्स (२ पुरुष १ महिला), क्लासिक त्रिपल्स (३ पुरुष) आणि ५ विरुद्ध ५ (किमान १ महिला खेळाडू) हे तीन प्रकार शोधण्यात आले व त्याचे स्पर्धेत रूपांतर करून ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती
,या स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री दत्तात्रय दराडे (ए टी.एस.हेड पुणे )यांच्या हस्ते करण्यात आले विजेता संघ मॉडर्न ट्रीपल्स -श्रेयश साने,अथर्व ख्रिस्ती सानिया तापकीर याना व कॉस्मिक सायक्लोन्स ,व क्लासिकस ट्रीपल्स संघाना श्री दत्तात्रय यांच्या हस्ते विजेता करंडक व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले पुण्यातील या नावीन्य पूर्ण बॅडमिंटनमधील बदलाच्या स्पर्धेच्या आयोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे आभार मिहीर तेरणीकर यांनी मानले .
फोटोची माहिती भविष्यवेधी अश्या आधुनिक बॅडमिंटनच्या स्पर्धेतीळ विजेत्यांना बक्षीस वितरण श्री दत्तात्रय दराडे (ए टी.एस.हेड पुणे )यांच्या हस्ते पुणे येथे नुकतेच करण्यात आले .याप्रसंगी आयोजक मिहीर तेहरणीकर ,आर्य भिवपाठकी,यश शाह