विश्व कल्याण, आत्मशुद्धी साठी आद्यस्वामी शिवानंद दादाजी परिवाराच्या वतीने महारुद्र महायज्ञ संपन्न, २५१ यज्ञ कुंडासमोर ४०० भाविकांनी दिली आहुती

विश्व कल्याण, आत्मशुद्धी साठी आद्यस्वामी शिवानंद दादाजी परिवाराच्या वतीने महारुद्र महायज्ञ संपन्न, २५१ यज्ञ कुंडासमोर ४०० भाविकांनी दिली आहुती

विश्व कल्याण, आत्मशुद्धी साठी आद्यस्वामी शिवानंद दादाजी परिवाराच्या वतीने
महारुद्र महायज्ञ संपन्न, २५१ यज्ञ कुंडासमोर ४०० भाविकांनी दिली आहुती
अहमदनगर (प्रतिनिधी) विश्वकल्याण, आत्मशुद्धी आणि चांगल्या पर्जन्यमानाची कामना करीत
आद्यस्वामी शिवानंद दादाजी परिवाराच्या वतीने नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन शेजारील
सरस्वती सभागृहात महारुद्र महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी उभारण्यात आलेल्या भव्य अशा यज्ञमंडपात २५१ यज्ञ कुंडासमोर
बसून दादाजी परिवाराच्या ४०० साधकांनी यज्ञ आहुती दिली.
व्यासपीठावर आद्यस्वामी शिवानंद दादाजी सोबत आद्य धुनी द्वारिका मैय्या, प. पु. धनंजय सरकार, सौ सायली ताई, प्रिया ताई यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्य यजमानपदी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, माजी महापौर सौ शैलाताई शिंदे, नंदनवन उद्योगसमूहाचे संचालक दत्त्ता शेठ जाधव, माजी स्थायी समिती सभापती सौ. सुवर्णाताई जाधव, राज संजय जाधव, कपिल संजय जाधव हे विराजमान होते.
सकाळी ९ वाजता यज्ञाला सुरुवात झाली. सायंकाळी ६ वाजता यज्ञाला पूर्णाहुती देण्यात येणार आहे. त्यांच्यानंतर स्वामीजी ज्ञानदान करणार आहेत.
केडगाव सोनेवाडी रस्त्यावरील लोंढे मळा येथील शिवानंद दादाजी दरबाराच्या वर्धापन दिनाच्यानिमित्ताने या यज्ञ सोहळा आणि स्वामींचे प्रवचन, विविध गुणदर्शन, स्वामी महाभिषेक विविध आरोग्य शिबिरे असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नंदनवन लॉन, सरस्वती सभागृह आणि शिवानंद दादाजी दरबार या ठिकाणी संपूर्ण सप्ताहभर हे कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक नगर पुण्यनगरीत दाखल झालेले आहेत. ज्ञानदान, ज्ञानचर्चेबरोबरच, ध्यानधारणा, योगसाधना, दीक्षा, जपणाम आदी कार्यक्रमात भाविक स्वामी भक्तीमध्ये तल्लीन आहेत.
या महोत्सव यशस्वी करण्यासाठी आद्य परम सद्गुरू स्वामी शिवानंद दादाजी , परमपूज्य माऊली माताजी, आद्य धुनी द्वारिका मैय्या, प पू. धनंजय सरकार,सौ सायली ताई, प्रिया ताई, यांच्या निर्देशानुसार बबन खेडकर, शिवाजीराव लोंढे, अमोघ नलगे, निवृत्ती लोंढे, उत्तम चौधरी, सुभाष लोंढे ,बबन बारहाते, भास्कर कापरे, कैलास कारले, जगन्नाथ जाधव, संजय डहाळे, सुरेश कुडाळ , संदेश कार्ले, मुळे सर , दुसुंगे मेजर , विलास जाधव, प्रवीण कोल्हे , पुलावळे काका , गावडे काका, गाडेकर काका, झाडे काका, योगेश मेहेर , प्रफुल्ल जगरवाल, विलास जाधव, निलेश कापरे , शेखर कुलकर्णी , विठ्ठल गुंजाळ, कुमावत काका, सागर जाधव डॉ. दीपक कांबळे, आदित्य लोंढे, बाळासाहेब जाधव, नानाजी पगारे, अशोक कोठावदे आदी प्रयत्नशील आहेत.